Farmers Protest | शेतकऱ्यांवर बळाचा वापर; अश्रुधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज


Farmers Protest |  शेतकऱ्यांच्या पीकांना हमीभाव मिळवा. यासाठी हमीभवाचा कायदा आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी देशातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन पुकारले असून, या आंदोलनासाठी देशभरातील अनेक राज्यांतील शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत. या शेतकऱ्यांना सीमांवरच अडवण्यासाठी केंद्र प्रशासनाने मोठी जय्यत तयारी केली होती. काही ठिकाणी सीमेंटचे बॅरीगेट्स तर.

काही ठिकाणी रस्त्यांवर तारा टाकण्यात आल्या होत्या. मात्र, तरीही मिळेल तो रस्ता पकडून शेतकरी दिल्लीत पोहोचले आहेत. दरम्यान, सर्व पर्याय वापरुन झाल्यावर अखेर पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर बळाचा वापर केला असून, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहेत. दरम्यान, केंद्र सरकारसोबतची प्राथमिक चर्चा फिस्कटल्याने देशातील शेतकऱ्यांनी ‘दिल्ली चलो’ हा मोर्चा सुरू केला आहे.(Farmers Protest)

या देशव्यापी आंदोलनासाठी शेतकरी हे दिल्लीच्या शंभू, खनौरी-जिंद व डबवाली या सीमा भागांवर पोहचले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना दिल्लीत शिरण्यापासून अडवण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर करायला सुरूवात केली आहे. पंजाब, हरियाणातून येणाऱ्या शेतकऱ्यांना दिल्लीच्या शंभू सीमेवर मोठ्या प्रमाणात शेतकरी एकत्र जमले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांना थांबवून धरणे हे पोलिसांसमोर्चे मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान, आता या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या आहे.

Farmers Protest | शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानेच राजधानी बिथरली

अश्रू धुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज

पंजाब आणि अंबालाकडून दिल्लीत येणाऱ्या मार्गावरील शंभू सीमेवर सध्या पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केलेला आहे. शेतकऱ्यांच्या ‘चलो दिल्ली मार्च’ या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पूर्ण दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आलेला आहे. दरम्यान, आंदोलनावर ठाम असणारे शेतकरी हे शंभू सीमेवर पोहचताच पोलिसांनी आंदोलक शेतकऱ्यांवर बाळाचा वापर करायला सुरुवात केली असून, या शेतकऱ्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्जदेखील केल्याची माहिती समोर आली आहे.

२०२० ची परिस्थिती पुन्हा

या आंदोलनात तब्बल २०० पेक्षाही अधिक शेतकरी संघटनांचा समावेश असून, हे सर्व शेतकरी जर इतक्या मोठ्या संख्येने दिल्लीत दाखल झाले. तर, पुन्हा एकदा २०२० च्या आंदोलनासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यासाठीच आंदोलक शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमांवरच पोलिस रोखण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र, शेतकरी जरी दिल्लीच्या सीमेवर आले असले, तरीही सरकारसोबत त्यांची चर्चा सुरू आहे.(Farmers Protest)

Farmers News | शेतकऱ्यांना मोफत वीज तर, मजुरांना वर्षाला इतकी रक्कम

Farmers Protest | चर्चा फिस्कटली

गेल्या आठवड्यात रात्री उशिरापर्यंत चंदीगड येथे केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल व कृषीमंत्री अर्जून मुंडा यांची आणि आंदोलनात सहभागी शेतकरी संघटनांची चर्चा झाली. मात्र, या चर्चेतून कुठलाही ठोस तोडगा निघाला नसल्याने शेतकऱ्यांनी हे आंदोलयांचे पाऊल उचलले आहे. तर, यावेळी केंद्र सरकारचे हे दोन मंत्री व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये तब्बल पाच तासांहून अधिक वेळ चर्चा पार पडली. मात्र ही चर्चा निष्फळ ठरली असून, आज शेतकरी दिल्लीच्या सीमांवर येऊन धडकले आहेत.

हजारो ट्रॅक्टर दिल्लीकडे रवाना

हमीभावाचा कायदा आणि आपल्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी अखेर देशातील शेतकऱ्यांनी दिल्ली गाठली आहे. पंजाबमधील फतेहगढ साहिब येथून आंदोलक शेतकऱ्यांनी ‘चलो दिल्ली मार्च’ हे आंदोलन सुरू केले असून येथून मोठ्या संख्येने ट्रॅक्टर दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. दरम्यान, हे ट्रॅक्टर दिल्लीच्या शंभू सीमेवर पोहोचले असता, पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये तनाव निर्माण झाले आणि या संतप्त शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी याठिकाणी बळाचा वापर केला. आता हे आंदोलन आणखी चिघळणार ? सरकार शेकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार का ? की पुन्हा शेतकऱ्यांना आश्वासन घेऊनच दिल्लीतून माघारी फिरावे लागणार ? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. (Farmers Protest)