Farmers News | शेतकऱ्यांना मोफत वीज तर, मजुरांना वर्षाला इतकी रक्कम


Farmers News |  शेतकऱ्यांना शेती करताना भासणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे वीज. ग्रामीण भगत सततच्या लोड शेडिंगमुळे शेतकऱ्यांना पीकांना पाणी भरण्यासाठी प्रसंगी रात्रीचा दिवसही करावा लागतो. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने कृषी क्षेत्रातील बजेटमध्ये तब्बल 33 टक्क्यांनी वाढ केली असून, सरकारने शेतीसाठी एकूण १३,४३८ कोटी रुपये मंजूर केले आहे.

तसेच या बजेटमध्ये शेतकरी हीतासाठी दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून, यानुसार आता सरकार शेतकऱ्यांना मोफत वीज पुरविणार आहे. फक्त शेतकऱ्यांसाठीच नाहीतर, शेतमजुरांसाठीही सरकारने एक मोठा निर्णयातघेतला असून, यानुसार आता मजुरांना तब्बल १०,००० रुपये सरकारतर्फे देण्यात येणार आहे. याबाबतची घोषणाही या बजेटमध्ये करण्यात आली आहे.(Farmers News)

Farmers News | देशातील ‘या’ शेतकऱ्यांवर सरकार लावणार कर?

Farmers News | या योजनांना मंजूरी…

दरम्यान, छत्तीसगड सरकारने विधानसभेत २०१४-२५ या आर्थिक वर्षासाठी १,४७,४४६ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला असून, यात सरकारने कृषी क्षेत्राचे बजेट हे तब्बल ३३ टक्क्यांनी वाढवले आहे. यात शेतकऱ्यांना शेतीसाठी एकूण १३,४३८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

तसेच छत्तीसगड सरकारतर्फे राज्य अर्थसंकल्पात ‘कृषक उन्नती’ या योजनेंतर्गत १०,००० कोटी रुपये तर, ‘जल जीवन’ मिशनसाठी ४,५०० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. कमी आणि मध्यम स्वरूपाचे उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना बळकटी देण्याच्या दृष्टीने छत्तीसगड सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. तर, या निर्णयाचा फायदा हा राज्यातील २४.७२ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना घेता येणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत २ लाख ३० हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. (Farmers News)

मजुरांना मिळणार इतका लाभ

छत्तीसगड सरकारच्या नव्या अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांना ५ हॉर्स पॉवर पर्यंतच्या कृषी पंपांसाठी मोफत वीज देण्यात येणार आहे. तसेच यासाठी ह्या अर्थसंकल्पात ३,५०० कोटी रुपयांची तरतूदही सरकारने केलेली आहे. दरम्यान, ‘दीनदयाल उपाध्याय भूमिहीन शेतमजूर योजना’ ही छत्तीसगडच्या विष्णुदेव सरकारतर्फे राज्यातील शेतमजुरांसाठी सुरू करण्यात आली होती. या योजने अंतर्गत भूमिहीन शेतमजुरांना प्रत्येक वर्षी तब्बल १०,००० रुपये इतका लाभ दिला जाणार आहे. तसेच यासाठीही छत्तीसगड सरकारच्या आर्थिक बजेटमध्ये ५०० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे.

 Farmers Scheme | ‘या’ योजनेसाठी सरकारने केली जोरदार तयारी!

शेतकरी अर्थव्यवस्थेचा कणा

आपल्या राज्यातील शेतकरी हे आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा असून, हा कणा मजबूत करण्याच्या दृष्टीने विष्णुदेव साईंच्या नेतृत्वाखाली छत्तीसगड सरकारने पहिल्या अर्थसंकल्पात ‘कृषक उन्नती’ या योजनेअंतर्गत तब्बल १०,००० कोटींची तरतूद केली आहे. या योजनेचा फायदा राज्यातील २४.७२ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी घेतला आहे. तसेच आता सरकारच्या बजेटमध्ये ‘सौर सामुदायिक सिंचन’ या योजनेसाठी ३० कोटींची तरतूद करण्यात आली असून, या योजनेंतर्गत ७९५ हेक्टर इतक्या शेतजमिनीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.(Farmers News)