Bajar Samiti | देवळा बाजार समिती बंद; तर, खासगी बाजार समित्यांमध्ये असे होते दर


Bajar Samiti | सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | केंद्र सरकारने बाजार समित्यांच्या धोरणात बदल करून निवडणुका न घेता कायमस्वरूपी प्रशासकाची नेमणूक करून कारभार चालविण्या २०१८ चे विधेयक मागे घ्यावे, यासह आणखी काही प्रलंबित मागण्यांसाठी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ सोमवारी (दि. २६) रोजी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये देवळा आणि उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीने सहभाग घेतला सन, याठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला.

यामुळे ह्या दोन्हीही बाजार समितींच्या आवारात आज शुकशुकाट असून, यामुळे येथील लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान देखील झाले आहे. जवळपास या बाजार समित्यांमधील दोन ते अडीच कोटी रुपयांची उलाढाल ही आज ठप्प झाली. तर दुसरीकडे देवळा येथील सुनील आहेर व रामेश्वर कृषी मार्केट खारीपाडा ह्या खाजगी बाजार समित्या मात्र चालू होत्या.(Bajar Samiti)

Bajar Samiti | नाशिकमधील १५ बाजार समित्या आज बंद; का पुकारला संप

Bajar Samiti | शेतकरी संघटनांचे आरोप

राज्य सरकारने ‘कृषी उत्पन्न पणन अधिनियम’ या विधेयकात काही सुधारणा केल्याने बाजार समित्यांसह समितीतील घटकांचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते. राज्यातील बाजार समित्यांवर प्रशासक बसविण्याची तयारी सुरू असल्याचे आरोप शेतकरी संघटनांनी केले असून, त्याच्या निषेधार्थ आज नशिक जिल्ह्यातील १५ बाजार समित्या बंद होत्या. तर, देवळा तालुक्यातील देवळा व उमराणे बाजार समित्यांचे देखील कामकाज बंद ठेवण्यात आले होते. यामुळे रोजच शेतकऱ्यांची वर्दळ असलेल्या देवळा व उमराणे बाजार समितीत आज मात्र शुकशुकाट दिसून आला.

दरम्यान, देवळा बाजार समितीत लाल कांद्याची होणारी आवक ही साधारणतः ७,५०० क्विंटल तर उमराणे बाजार समितीत तब्बल आठ हजार क्विंटल आवक होत असून, येथे सरासरी १,५०० रुपयांच्या बाजार भावाच्या खरेदीच्या हिशोबाने आजच्या बंदमुळे ही दोन ते अडीच कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.

Farmer Strike | पीकाला भाव न मिळाल्याने शेतकऱ्याने बाजार समितीत काढले कोयता अन् पिस्तूल 

खाजगी बाजार समितीत असा होता भाव..?

तर, देवळा येथे सकाळच्या सत्रात सुनील आहेर खाजगी कृषी मार्केटमध्ये ६,००० क्विंटल लाल कांद्याची आवक झाली होती. कमीत कमी ६००, जास्तीत जास्त २१००, आणि सरासरी १७५० असा बाजारभाव होता. तर, रामेश्वर कृषी मार्केट खारीपाडा येथे ६००० क्विंटल कांद्याची आवक झाली असून, येथे कांद्याचे भाव हे कमीत कमी ४३०, जास्तीत जास्त २०००, सरासरी १७०० असा लाल कांद्याला बाजार भाव मिळाला.(Bajar Samiti)

केंद्र सरकारने बाजार समितींच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी, शेतकऱ्यांनी निवडुन दिलेल्या संचालक मंडळावर गदा आणुन, कायमस्वरूपी प्रशासक नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. तर, व्यापारी, दलाल व सत्तेवर आलेल्या राजकीय बगलबच्यांची सोय व्हावी या उद्देशाने नविन कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. ती सर्वस्वी गैर असुन शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारी आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समितीत्यांचे कामकाज बंद करून या बंद आंदोलनाला समर्थन दिल्याबद्दल प्रशासनाचे जाहीर आभार

  • कुबेर जाधव, समन्वयक – स्वाभिमानी शेतकरी संघटना, नाशिक