PM Kisan Nidhi | उद्या पंतप्रधान शेतकऱ्यांच्या खात्यावर २,००० रुपये जमा करणार


PM Kisan Nidhi |  शेतकऱ्यांची प्रतीक्षा उद्या संपणार असून, आता सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन-दोन हजार रुपये जमा करणार आहे. तर, यानुसार उद्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे वितरण होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा हा हप्ता हस्तांतरित केला जाणार आहे. ही केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी भेट असणार आहे. या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना ६,००० रुपये वार्षिक निधी देत असते.

१६ व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली

मागील चार महिन्यांपासून शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या या सोळाव्या हप्त्याची वाट पाहत होते. दरम्यान, आता त्यांची ही प्रतीक्षा अखेर संपली असून, उद्या या हप्त्याचे वितरण केले जाणार आहे. याआधी या योजनेचा पंधरावा हप्ता नोव्हेंबर महिन्यात मिळाला होता. तब्बल नऊ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना या निधीचे वाटप होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जारी केला जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना दर वर्षाला ६,००० रुपये मिळतात. तर, ही रक्कम तीन हप्त्यांत दिली जाते. दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन – दोन हजार रुपये जमा केले जातात. (PM Kisan Nidhi)

PM Kisan | मुहूर्त ठरला; यादिवशी मिळणार ‘पीएम किसान’चा १६ वा हप्ता

PM Kisan Nidhi | याच शेतकऱ्यांना मिळणार लाभ

नोव्हेंबर नंतर अनेक दिवसांपासून शेतकरी या हप्त्याची वाट पाहत होते. या योजनेशी संलग्न असलेली महाराष्ट्र शासनाची ‘नमो शेतकरी सन्मान’ योजनेच्या अंतर्गतही राज्यातील शेतकऱ्यांना निधी दिला जातो. दरम्यान, उद्या पीएम किसान योजनेच्या १६ वा हप्ता वितरित केला जाणार आहे. तर ही रक्कम उद्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा केली जाणार आहे. मात्र, या योजनेच्या लाभासाठी केंद्र सरकारने काही कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले होते. पण ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई-केवायसी किंवा एएनपीसीआय केलेले नाहीत. त्यांनी याची लवकरात लवकर पूर्तता करायची आहे. कारण केवळ ई-केवायसी किंवा एएनपीसीआय न केलेल्या शेतकऱ्यांनाच १६ व्या हप्त्याचा निधी मिळणार आहे.

PM Kisan | ‘पीएम किसान’ वंचित शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची विशेष मोहीम

आतापर्यंत १५ हप्त्यांचे वितरण

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी २०१९ मध्ये ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ ही योजना सुरू केली असून, २०१९ पासून आतापर्यंत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीचे तब्बल १५ हप्ते जारी केले आहेत. तार, आता हा सोळावा हप्ता उद्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. (PM Kisan Nidhi)