Farmer Strike | पीकाला भाव न मिळाल्याने शेतकऱ्याने बाजार समितीत काढले कोयता अन् पिस्तूल 


Farmer Strike | आधी पावसाने दगा दिला. नंतर कशीबशी पीकं उभी केलीत तर, त्यात अवकाळीने झोडपले. शेतकाऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला. गेले वर्ष हे शेतकऱ्यांसाठी अतिशय प्रतिकूल ठरले. त्यातही जी पिके आहेत त्यांना भाव नाही, अन् जी नाहीयेत त्यांना बाजार समित्यांमध्ये चढे दर मिळत आहेत. यासर्व परिस्थितीमुळे हतबल झालेला बळीराजा आता आक्रमक झाल्याचे राज्याच्या अनेक भागांमध्ये पाहायला मिळत आहे.  

कमी खर्चाचे म्हणजेच सोयाबीन. या सोयबीनचे उत्पादन हे राज्यात बहुतेक ठिकाणी घेतले जाते. मात्र, सध्या राज्यात सोयाबीनला योग्य दर मिळत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे शेतकरी आक्रोश करत आहेत. दरम्यान, बुलढाण्यात एका आक्रमक शेतकऱ्याने हातात कोयता व पिस्तूल घेत खामगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर आक्रोश व्यक्त केला. त्यामुळे यानंतर आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली होती. सोयाबीन या पीकाला प्रति क्विंटल 6 हजार रुपये इतका दर देण्यात यावा, अशी या संतप्त शेतकऱ्याची मागणी होती. आणि हा दर मिळत नसल्याने रागाच्या भरात त्याने सोयाबीन रस्त्यावर फेकून दिली. (Farmer Strike)

Farmer News | सरकारचे ‘न्यू इयर गिफ्ट’; पिक कर्जासंदर्भात मोठा निर्णय

हतबल शेतकऱ्यांचा राग अनावर 

राज्यात यंदा ऐन पावसाळ्यात पावसाने दडी मारली. त्यामुळे राज्यातील शेतकरी वर हा आधीच खचला होता. त्यानंतर अवकाळीने झोडपले. या अवकाळीचा आणि गारपिटीचा मोठा परिणाम सोयाबीन पिकाच्या वाढीवर झाला. अनेक ठिकाणी सोयाबीनची वाढ खंडित झाली. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली. अवकाळीतून सवरतो तोच त्यानंतर ‘येलो मोझॅक’ हा नवा बुरशीजन्य रोग सोयाबीनच्या उभ्या पीकावर पडला.

त्याचाही मोठा परिणाम सोयाबीनच्या उत्पादनावर झाला. दरम्यान, या सर्वामुळे राज्यातील सोयाबीनचे उत्पादन हे अर्धे झाले असल्याचे शेतकरी संगितले. या सर्व समस्यांना तोंड देत पीक विक्रीला आणले. तर, आता या पीकाला भावच मिळत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी वर्ग हा हवालदिल झाला असून, अशाच एका संतापलेल्या शेतकऱ्याने आज त्याच्या सोयाबीन पिकाला योग्य भाव मिळत नसल्याने रागाच्या भरात हातामध्ये कोयता व देशी कट्टा घेत बुलढाण्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर निदर्शने केली. (Farmer Strike)

Farmers News | शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार! भारत सरकारने आखला मेगा प्लॅन

निदर्शन करणारा शेतकरी पोलिसांच्या ताब्यात 

दरम्यान, संबंधित संतप्त शेतकाऱ्याचे नाव हे रवी महानकार असून, हा अकोला जिल्ह्यात पिंपळखुटा येथे वास्तव्यास आहे. तसेच, या शेतकऱ्याने आतापर्यंत तब्बल १०० क्विंटल इतकी सोयाबीन विकली असल्याचे सांगितले जात आहे. पण या बदल्यात मिळालेला मोबदला हा कमी असून, सोयाबीनला प्रती क्विंटल सरासरी ६ हजार रुपये दर देण्यात यावा अशी त्याची मागणी होती.

” आमच्या शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. मी माझी विकण्यासाठी आणलेली सोयाबीन ही रस्त्यावर फेकून देत या सरकारचा निषेध केला आहे. आज त्यासाठी मी हातात शस्त्र उचलले” असल्याचे संतप्त रवी महानकर हे यावेळी म्हणाले. दरम्यान, या घटनेची माहिती संबंधित पोलिसांना कळताच ते तेथे घटनास्थळी दाखल झाले आणि रवी महानकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा सविस्तर तपास पुढे सुरू आहे.(Farmer Strike)