Agriculture News | अमित शहांनी नॅनो युरिया-डीएपीबाबत केली मोठी घोषणा


Agriculture News | भारतात पारंपारिक शेतीसह आता आधुनिक शेतीचे महत्त्व देशातील शेतकऱ्यांना सातत्याने सांगितले जाते. मात्र आधुनिक शेती करताना काही बाबींमध्ये देशातील शेतकऱ्यांना पारंपारिक गोष्टी वापरण्याचा सल्ला देशातील मंत्री देताना दिसत आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुधवारी नवी दिल्लीत केंद्रीय निबंधक सहकारी संस्थांच्या कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन करताना बोलत होते.

यावेळी बोतलाना ते म्हणाले की, इफकोने नॅनो लिक्विड डीएपी आणि नॅनो लिक्विड युरियाचे उत्पादन केले असून ते फार कमी वेळेत शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचवले आहेत. यावेळी याची नितांत गरज असून यामागील महत्वाचं कारण म्हणजे देशातील उत्तम शेती उत्पादनांसाठी भूमी संवर्धन अत्यंत आवश्यक असून देशातील खेड्यापाड्यात ड्रोनद्वारे द्रव युरिया फवारण्याकडे सर्वाधिक आकर्षण दिसून येत आहे.

Agriculture News | ग्रामीण अर्थव्यवस्था आधुनिकतेशी जोडली जात असल्याचा विश्वास

तसेच, आता जेव्हा ड्रोन दीदी PACS द्वारे ड्रोनने शेतात फवारणी करतात तेव्हा ग्रामीण अर्थव्यवस्था आधुनिकतेशी जोडली जात असल्याचा विश्वास लोकांमध्ये निर्माण होत असून सहकार क्षेत्रातही गेल्या दोन वर्षांत अनेक अभूतपूर्व कामे झाली आहेत. देशातील सहकार क्षेत्राने विश्वासार्हता गमावली तर विस्तार तर होणार नाहीच, पण अस्तित्वाचे संकटही निर्माण होण्याची शक्यता आहे.

Agriculture News | भारतीय अर्थव्यवस्थेत सहकारी संस्थांचे मोठे योगदान

सहकार क्षेत्राबद्दल बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, पाच ट्रिलियन डॉलरच्या भारतीय अर्थव्यवस्थेत सहकारी संस्थांचे मोठे योगदान सुनिश्चित करून, आम्ही ते 21 व्या शतकात नेणार आहोत. केवळ सहकार क्षेत्रानेच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कोट्यवधी गरीब लोकांना भांडवलाशिवाय देशाच्या विकासात हातभार लावण्याची क्षमता केवळ सहकार क्षेत्रामध्ये आहे. आज गुजरातमधील 36 लाख कुटुंबे पशुपालन व्यवसायात गुंतलेली असून त्यांची वार्षिक उलाढाल 60 हजार कोटी रुपये आहे, हा सहकाराचा चमत्कार आहे.