PM Modi | देशात वाढत्या आधुनिकीकरणामुळे सध्या देशातील कृषी क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात आधूनिकीकरण आणलं जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 08 जानेवारी रोजी विकास भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला होता. या कार्यक्रमात नैसर्गिक आणि पारंपारीक शेतीच्या पद्धतीवर चर्चा करताना पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना खतांच्या वापरावर नियंत्रण ठेवण्यास सांगितले असून यामागील कारण म्हणजे अनेक शेतकरी युरियासोबत नॅनो युरियाचा वापर करत आहेत.
देशासह महाराष्ट्रात, प्रत्यक्षात शेतकऱ्यांमध्ये सातत्याने जागृती केली जात असून खतांचा वापर तर्कसंगत करण्यासाठी माती परीक्षणही केले जाते. तसेच शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिकाही देण्यात येत आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, मी देशातील शेतकऱ्यांनी युरिया आणि नॅनो युरिया दोन्हीही शेतात वापरू नये. तसेच जिथे उपलब्ध असेल तिथेच फक्त नॅनो युरिया वापरण्याचे आवाहन पं. मोदी यांनी देशातील शेतकऱ्यांना केले आहे.
PM Modi | सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न
देसात जेव्हा ‘सबका साथ, सबका विकास’ या भावनेने सरकार काम करते तेव्हाच योजनांचा लाभ देशातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचतो. देशातील शेतकऱ्यांना आपलं शेत निरोगी ठेवण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला जात असतो.
मात्र त्याच वेळी, सरकार देशात सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असून सेंद्रिय शेती अंतर्गत, सेंद्रिय खतांचा वापर जमिनीला पोषण देण्यासाठी केला जातो. यामध्ये जनावरांचे शेण-मूत्र, गांडुळ कंपोस्ट इत्यादींपासून बनवलेले सेंद्रिय अथवा जैविक खतं तसेच शेतात सोडलेल्या वनस्पतींचा कचरा यांचा समावेश होत असतो. यामुळे पर्यावरणाचा फायदा तर होतोच, पण शेतातील मातीचे आरोग्यही मोठ्या प्रमाणात सुधारत असते.
PM Modi | नॅनो युरिया म्हणजे काय?
नॅनो युरिया हे द्रवरूप खत असून हे इतर खतापेक्षा चांगले आहे. तुम्ही शेतात उभ्या असलेल्या पिकांवर 2-4 मिली प्रति लिटर पाण्यात (किंवा 250 मिली / एकर 125 लिटर पाण्यात) द्रावण फवारू शकतात. धान्य, कडधान्ये, भाजीपाला, फळे, फुले, औषधी इत्यादी सर्व प्रकारच्या पिकांवर नॅनो युरियाचा वापर करता येतो.