Onion Farmers | जिल्ह्यातील ‘या’ पिकांसाठी ही थंडी ठरणार फायद्याची


Onion Farmers | सध्या महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात वातावरणात अनेक बदल होत असून गेल्या ४-५ दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढत आहे. नाशिक जिल्ह्यातील तापमान हे दिवसेंदिवस घसरत असून हवामानात बदल झाला असल्याने राज्यात अनेक भागात हवेतील गारवा वाढत आहे. गेल्या चार दिवसापासून थंडी वाढत असल्याने द्राक्ष नगरी असलेल्या नाशिकमधील निफाड तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांची झोप उडाली आहे. घसरत्या तापमानामुळे द्राक्षबागायतदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

सध्या नाशिक जिल्ह्यात द्राक्ष बागांची काढणी अंतिम टप्प्यात आली असून काही बागायतदारांचे द्राक्ष काढणी पुर्ण झाली आहे. मात्र ज्या बागायतदारांची द्राक्ष काढणी बाकी आहे त्यांची घसरत्या तापमानामुळे चिंता वाढली आहे. नाशिक जिल्ह्यासह निफाड तालुक्यात घसरत्या तापमानामुळे द्राक्षबागेत सकाळपासून रोगप्रतिकारक औषधांची फवारणी करुन संभाव्य धोक्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न द्राक्ष बागायतदार करताना दिसत आहेत.

Onion Farmers | कांदा, गहू, हरभरा उत्पादक शेतकरी सुखावला

नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा, गहू, हरभरा, टोमॅटो तसेच इतर पिके घेतली जातात. सध्या पडणार्‍या कडाक्याच्या थंडीमुळे ही सर्व पिके जोमदार दिसत असून नाशिक जिल्ह्यातील कांदा, गहू, हरभरा या पिकांसाठी ही थंडी फायद्याची ठरणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कांदा, गहू, हरभरा उत्पादक शेतकरी सुखावला आहे.

Onion Farmers | नाशकातील द्राक्ष उत्पादक मात्र चिंतेत

मात्र जिल्ह्यातील काही भागांत सकाळी धुके पसरत असल्यामुळे काही पिकांवर रोग पसरण्याची शक्यता वर्तविली जात असून त्यामुळे शेतकरी आपल्या पिकांना रोगप्रतिबंधक औषधे मारण्याच्या तयारीला लागलेले आहेत. मात्र वाढती थंडी ही काही पिकांसाठी चागंली असली तरीही द्राक्ष पंढरी म्हणुन ओळख असलेल्या नाशकातील द्राक्ष उत्पादक मात्र चिंतेत आहेत.