Agriculture News | मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार खतांवर अनुदान


Agriculture News |  लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांचा रोष कमी करण्याच्या दृष्टीने ठोस पाऊले उचलत आहे. कालच केंद्र सरकारने यवतमाळ येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेतकऱ्यांना ‘पीएम किसान सन्मान निधी’चे वितरण केले. दरम्यान, आता पुन्हा शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय सरकारने घेतला आहे.

यानुसार, आता खतांवर शेतकऱ्यांना आता केंद्र सरकारकडून भरघोस अनुदान मिळणार आहे. खरीप पेरणीच्या मुहूर्तावर हा निर्णय सरकारने घेतला आहे. तर, यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत २४,४२० कोटींच्या अर्थसंकल्पालाही मंजुरी देण्यात आली आहे. एकीकडे दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असल्यामुले तेथील शेतकरी हे सरकारवर नाराज आहेत. तर, दुसरीकडे कांदा निर्यातबंदीमुळे महाराष्ट्रातील शेतकरी केंद्र सरकारवर नाराज आहेत. (Agriculture News)

Agriculture News | शेतकऱ्यांच्या कर्जाबाबत मोठी घोषणा..?

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर हा भाजप प्रणीत सरकारसाठी मोठा धक्का ठरू शकतो. त्यामुळे सध्या आगामी निवडणुका लक्षात घेऊन देशातील शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना आणल्या जात आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत खरीप हंगामातील पिकांसाठी फॉस्फेटिक आणि पोटॅश या खतांवर एकूण २४,४२० कोटींच्या खत विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. देशात वापरले जाणारे प्रमुख खत डीएपी हे १,३५० रुपये प्रति क्विंटल या भावात उपलब्ध केल्याची माहिती समोर आली आहे.

खताचे दर स्थिर राहण्यास मदत होईल…

डाय-अमोनियम फॉस्फेट आणि फॉस्फेटिक व पोटॅश या खतांच्या किंमती या आता किरकोळ स्थिर राहतील, असेही सरकारने सांगितले आहे. दरम्यान, १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या काळात फॉस्फेटिक व पोटॅश (P&K) या खतांवर सबसिडी मिळणार आहे. यानुसार खत विभागाच्या ‘पोषणावर आधारित सबसिडी’चे दर निश्चित करण्याच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे.

Agriculture News | ऊस टंचाईमुळे राज्यभरात ऊसाची वाहतूक न करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

Agriculture News | फायदे काय..?

  • या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना अनुदानित, परवडणाऱ्या तसेच वाजवी दरात खते मिळतील.
  • खतांचे व निविष्ठांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील दरांमधील अलीकडील कल लक्षात घेऊन फॉस्फेटिक व पोटॅसिक या खतांवरील अनुदानाचे सुसूत्रीकरण करण्यात येईल.
  • पोषण तत्वांवर आधारित अनुदानाच्या योजनेअंतर्गत ३ नवीन खतांच्या श्रेणींचा समावेश केल्याने मातीचे आरोग्य संतुलित राहण्यास मदत होईल. तसेच मातीच्या गरजेनुसार सूक्ष्म व पोषक तत्वांनी युक्त खते निवडण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य पर्याय उपलब्ध होतील.
  • तसेच देशातील शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत खते उपलब्ध व्हावीत. यासाठी खत उत्पादक कंपन्यांना निश्चित दरांनुसार अनुदान देण्यात येईल.(Agriculture News)