PM Kisan 16th Installment | ज्यांना पीएम किसानचा हप्ता मिळाला नाही त्यांनी काय करायचं..?


PM Kisan 16th Installment |  काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते. त्यांच्या बहिणीच्या मतदार संघात त्यांचा काल दौरा होता. यावेळी त्यांनी येथे विकास कामांचे उद्घाटन केले. तसेच बहूप्रतीक्षित आणि शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अशा ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ योजनेचा १६ व्या हप्त्याचे वितरण केले. मात्र, काही शेतकरी हे या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. त्या शेतकऱ्यांनी काय करावं ? याबाबत आपण माहिती घेणार आहोत. यासाठी हे सविस्तर वृत्त वाचा… (PM Kisan 16th Installment)

नोव्हेंबर मध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १५ वा हप्ता मिळाला होता. दरम्यान, यानंतर १६ व्या हप्त्याचे वितरण कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, अखेर पंतप्रधानांनी ही प्रतीक्षा संपवली असून, काल हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा झाला. मात्र, काही शेतकऱ्यांना हा लाभ मिळाला नाही. याचे कारण म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी जमिनीची कागदपत्रे अपलोड कलेली नव्हती, त्यांच्या बँक खात्याशी आधार लिंक केलेले नव्हते, तसेच पोर्टलवर जाऊन ई-केवायसी केलेली नव्हती, त्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १६ वा हप्ता मिळाला नाही.

PM Kisan Nidhi | उद्या पंतप्रधान शेतकऱ्यांच्या खात्यावर २,००० रुपये जमा करणार

PM Kisan 16th Installment | ९ कोटी शेतकऱ्यांना फायदा

दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत देशातील पात्र शेतकऱ्यांना आर्थिक स्थिती सुधारावी तसेच आर्थिक मदत व्हावी, यासाठी त्यांना दर वर्षाला ६,००० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. दर दोन महिन्यांनी हा २,००० हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जातो. तर, या योजनेच्या आतापर्यंत १६ हप्त्यांचे वितरण झाले असून, ११ कोटींहून अधिक पात्र शेतकऱ्यांना २. ८१ लाख कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले. तसेच काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथून या योजनेच्या १६ वा हप्ता जारी केला असून, या अंतर्गत तब्बल ९ कोटी शेतकऱ्यांना २१ हजार कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले.

PM Kisan | मुहूर्त ठरला; यादिवशी मिळणार ‘पीएम किसान’चा १६ वा हप्ता

पुढील हप्त्याचा लाभ घेण्यासाठी, आजच ‘या’ गोष्टी करा..

पीएम किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी काही गोष्टी अनिवार्य असून, त्यांची पूर्तता न केल्यामुळे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. यात प्रामुख्याने शेतीची कागदपत्रे अपलोड करणे, तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक करणे व ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. पीएम किसानच्या पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे गरजेचे आहे. ओटीपी आधारित ई-केवायसी करण्याचा पर्याय हा पीएम किसानच्या पोर्टलवर आहे. जर, तुम्हाला बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी करायचे असेल तर, त्यासाठी तुम्ही जवळच्या सीएससी केंद्रांशी संपर्क साधू शकतात. याबाबत अधिक माहितीसाठी http://pmkisan.gov.in या वेबसाइटला भेट द्या.(PM Kisan 16th Installment)