Agriculture News | ऊस टंचाईमुळे राज्यभरात ऊसाची वाहतूक न करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन


Agriculture News | नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊसाचे उत्पादन घेतले जाते तसेच नाशिक जिल्ह्यात रानवड, नासाका आणि कादवा हे सहकारी साखर कारखाने असून रावळगाव आणि द्वारकाधीश हे खाजगी साखर कारखाने आहेत. या कारखान्यांमुळे नाशिक जिल्ह्यात ऊसाला मोठ्या प्रमाणात मागणी असून चालू हंगामात संपुर्ण महाराष्ट्रात 202 कारखाने ऊसाचे गाळप करत आहेत.

बिझनेस लाइनच्या अहवालानुसार, आतापर्यंत ४४१.०१ लाख टन ऊस साखर तयार करण्यासाठी वापरण्यात आला असून त्याची किंमत सुमारे १३,०५६ कोटी रुपये इतकी आहे. मात्र, राज्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना फक्त १३,०५६ कोटी रुपये दिले असून, हे देय एकूण एफआरपीच्या ९६ टक्के इतकेच आहे. म्हणजेच खाजगी कारखानदारांकडे शेतकऱ्यांचे ५८६ कोटी रुपये अजूनही थकीत आहेत. साखर कारखानदारांनी उसाचे पैसे वेळेवर दिले त्या पैशांमधून शेतकरी इतर पिकांची पेरणी वेळेवर करू शकतील, असे मत शेतकरी संघटनांनी मांडले आहे.

Agriculture News | राज्यभरात ऊसाची वाहतूक न करण्याचे आवाहन

दरम्यान, कर्नाटक सीमेजवळील काही साखर कारखानदारांनी कथित ऊस टंचाईमुळे राज्यभरात ऊसाची वाहतूक न करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले असून, मराठवाडा आणि विदर्भातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात चिंतेचा सामना करावा लागत आहे. यामगील कारण म्हणजे ऊसाची उचल करण्यात विलंब आणि मुबलक पाणीसाठा नसल्याने याचा थेट परिणाम पीक उत्पादनावर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Agriculture News | शेतकऱ्यांना पोलिसांनी स्टेशनवरच थांबवून ताब्यात घेतले

आता याच संदर्भात एक मोठी अपडेट काल आली असून, महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी टोमॅटोची आयात बंद करण्याची मागणी सरकारकडे केलेली आहे. लातूर जिल्ह्याला दुष्काळी जाहीर करून नुकसानभरपाई देण्याची मागणीही लातूरच्या शेतकऱ्यांनी केली होती आणि या मागण्यांबाबत शेतकऱ्यांनी शहरातील हरंगुळ रेल्वे स्थानकावर रेलरोको करण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र या आंदोलनासाठी आलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी स्टेशनवरच थांबवून ताब्यात घेतले होते.