PM Kisan | मुहूर्त ठरला; यादिवशी मिळणार ‘पीएम किसान’चा १६ वा हप्ता


PM Kisan | शेतकरी ज्या घोषणेची अनेक दिवसांपासून वाट पाहत होते. त्या निर्णयाची अखेर घोषणा झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारतर्फे शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी. यासाठी अनेक शेतकरी हिताच्या योजना राबवल्या जातात. त्यापैकीच एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना. या योजनेअंतर्गत, भारत सरकार वर्षाभरातून तीन वेळा  २,००० रुपयांचे तीन हप्ते जारी करते. म्हणजे एका वर्षात शेतकऱ्यांना ६००० रुपये दिले जातात. आता पर्यंत या योजनेचे पंधरा हप्ते वितरित करण्यात आले असून, कित्येक दिवसांपासून शेकरी १६ व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर, अखेर ही प्रतीक्षा संपली असून, १६ वा हप्ता वितरित होण्याचा मुहूर्त ठरला आहे. (PM Kisan)

‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ या योजनेचा १६ वा हा हप्त्याचे लवकरच शेतकऱ्यांना वितरण केले जाणार असून, हा हप्ता कधी जमा होणार आहे हे जाहीर करण्यात आले आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या निधीचे वितरण होणार आहे. तर, पुढील आठवड्यात या १६ व्या हप्त्याचे पैसे हस्तांतरित केले जाणार आहेत.

PM Kisan | ‘पीएम किसान’ वंचित शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाची विशेष मोहीम

PM Kisan | अधिकृत माहिती अशी…

होळीपूर्वीच सरकारकडून शेतकऱ्यांना ही आनंदवार्ता दिली जाणार आहे. या पूर्वीच करोडो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लवकरच जमा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात या बहुप्रतीक्षित हप्त्याचे पैसे वर्ग करण्यास सुरुवात करणार आहेत.

पीएम किसान या योजनेच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून याबाबत सांगण्यात आले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील आठवड्यात पीएम किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचे पैसे हस्तांतरित करणार आहेत. तरी, पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १६ वा हप्ता हा माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यास सुरुवात होणार असून, २८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातून हा हस्तांतरित केला जाणार आहे. हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे जमा केला जाईल.

PM Kisan | ‘पीएम किसान’चा लाभ हवा असेल तर, आताच ‘या’ बाबींची पूर्तता करा

पुढील आठवड्यात मिळणार हप्ता

दरम्यान, ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी’ योजनेअंतर्गत आतापर्यंत देशातील शेतकऱ्यांना एकूण १५ हप्त्यांचे वितरण केले गेले आहे. गेल्या वर्षी १५ नोव्हेंबरला १५ वा हप्ता वितरित करण्यात आला होता. तर, नोव्हेंबरपासून आता एकूण ४ महिने उलटले असून, आता फेब्रुवारीत हा हप्ता मिळणार असल्याचे सांगितले जात होते. त्यानुसात आता पुढील आठवड्यात हा हप्ता मिळणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही PM किसान सन्मान निधी या योजनेच्या अधिकृत https://pmkisan.gov.in/ या वेबसाइटला भेट देऊ शकता. (PM Kisan)