Unseasonal Rain | राज्यात गारपीटीसह तूफान पाऊस; उभे पीक डोळ्यांसमोर वाहून गेले..!


Unseasonal Rain |  देशात आता थंडीची लाट कमी होत असून उन्हाची झळ बसण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, यातच आता राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांत काल अवकाळीने हजेरी लावली होती. दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात काल दिवसभर ढगाळ वातावरण होते आणि संध्याकाळपासून ढगांच्या गडगडटासह आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची तूफान बरसात सुरू होती. यात जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये गारपीट देखील झाली असून, शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. तसेच पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

वाऱ्यामुळे मंडप कोसळल्याने वृद्ध भाविक अडकले

दरम्यान, यामुळे शेतकऱ्यांचा हाताशी आलेला घास पुन्हा एकदा हिरावला आहे. बुलढाणामधील चिखली, देऊळगाव राजा रोड हा पूर्ण गारांनी झाकला आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये गारांचे खच पडले आहेत. गारपीटीचा फटका पक्षांनाही बसला असून, शेकडो बगळ्यांचा मृत्यू झाला आहे. तर, एका ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे भागवत कथा सुरू असलेला मंडप कोसळला असून, अनेक वृद्ध भाविक हे त्या मंडपाखाली दाबले गेले होते. तर, प्रसंगावधान राखून गावातील तरुणांनी या भाविकांना बाहेर काढले. शेतकऱ्यांचा काढणीला आलेला गहू, हरबऱ्याचे अवकाळीमुळे त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाला आहे. सतत तीन ते चार तास हा जोरदार वादळ वाऱ्यासह पाऊस सुरु होता. जणू काही जिल्ह्यात निसर्गाचा कोप झाला होता. (Unseasonal Rain)

Rain Update | यावर्षी ‘या’ महिन्यात दाखल होणार मान्सून

तीन-चार वर्षांपासून शेतकऱ्यांचे नुकसान…

मागील तीन-चार वर्षांपासून सतत कुठल्या ना कुटल्या आस्मानी संकटांमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागत आहे. दरम्यान, आता पुन्हा अवकाळीचा तडाखा बसल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पीक काढणीला आले होते. विशेषतः गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले असून, या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Unseasonal Rain | वीज कोसळून दोघांचा मृत्यू…

दरम्यान, कालच्या या पावसात वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला आहे. भोकरदन आणि जाफराबाद या दोन्ही तालुक्यात सायंकाळी सहा वाजेपासून तूफान वादळ वाऱ्यासह गारपीट ही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यात पल्लवी विशाल दाभाडे (वय – २१ वर्ष, कुंभारी तालुका भोकरदन) व शिवाजी कड (वय – 38, सिपोरा ता.भोकरदन) यांचा मृत्यू झाला आहे.

Rain Update | शेतकऱ्यांनो सावधान! राज्यात पुन्हा अवकाळी बरसणार

तुपकरांनी तातडीने फिरवले जिल्हाधिकाऱ्यांना फोन 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी तातडीने जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला आणि त्यांच्याशी जिल्ह्यातील एकूण परिस्थिती बाबत चर्चा केली आहे. तसेच यावेळी त्यांनी तातडीने उद्यापासूनच नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे करण्याची विनंती जिल्हा प्रशासनाला केली आहे. (Unseasonal Rain)