Onion News | आता कांदा सडलेला असेल तर सांगणार ‘हे’ नवं तंत्रज्ञान


Onion News | नाशिक जिल्ह्यासह जवळपास संपूर्ण राज्यात कांद्याची लागवड केली जाते मात्र सध्या कांद्याला बाजारात दर मिळत नसल्याने ते कोल्ड स्टोअरमध्ये साठवून ठेवावे लागतात. त्यासाठी त्यांना कोल्ड स्टोअरच्या मालकाला भाडे म्हणून मोठी रक्कमही द्यावी लागत असते. मात्र असे असतानादेखील शीतगृहात मोठ्या प्रमाणात कांदे सडलेले आहेत. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नाहक नुकसान सहन करावे लागते.

कांदा साठवणुक करत असताना गोणीत अधिक कांदा सडलेला आढळून आल्यास व्यापारी कमी दराने शेतकऱ्याकडून कांदा खरेदी करत असतात. मात्र आता शेतकर्‍यांनी काळजी करण्याची गरज नसून, कारण कोल्ड स्टोअरमध्ये ठेवलेल्या कांद्याचे सडणे कमी करण्यासाठी सरकार एआय-आधारित गोदाम तयार करण्याचा विचारात आहे. या AI-आधारित गोदामांमुळे कांद्याची नासाडी सुमारे 5 टक्क्यांनी कमी होऊ शकते.

Onion News | नाशिक येथे पहिली AI-आधारित स्टोरेज सुविधा

हा एक पायलट प्रोजेक्ट असून हा प्रोजेक्ट मार्चमध्ये सुरू होणार असून प्रायोगिक टप्प्यात, कांदा उत्पादक राज्यांमध्ये सुमारे 100 AI-आधारित साठवण सुविधा विकसित केल्या जाणार आहेत. तसेच पुढील तीन वर्षांत ही संख्या सुमारे 500 केंद्रांवर नेली जाणार असून नॅशनल कोऑपरेटिव्ह कन्झ्युमर फेडरेशनच्या सहकार्याने नाशिक, महाराष्ट्र येथे पहिली AI-आधारित स्टोरेज सुविधा उभारली जाईल.

Onion News | गोणीत एक कांदाही सडला तर सेन्सर त्याबद्दल सांगणार

दरम्यान, यानंतर मध्य प्रदेश आणि कर्नाटकसह भिड, लातूर आणि इतर कांदा उत्पादक भागात या सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहे. AI-आधारित सेन्सर्स 100 च्या बॅचमधील विशिष्ट कांदेदेखील ओळखतील जे कांदे सडण्यास सुरुवात झाली आहेत. म्हणजे कांद्याच्या गोणीत एक कांदाही सडला तर सेन्सर त्याबद्दल सांगणार आहे.