Farmers Issues | शेतकऱ्यांवर मोदी सरकारचा ‘हा’ दुहेरी आघात…!


Farmers Issues | शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक झाल्याचं आज पहायला मिळालं.

Farmers Issues | सध्या राज्यासह देशातील शेतकऱ्यांना अनेक संकंटांना सामोरे जावे लागत असून सरकार मात्र या प्रश्नांकडे जाणुनबुजून दुर्लक्ष करतंय का असा सवाल देशातील शेतकरी उपस्थित करत आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आज दिल्लीतील मुख्यालयात पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित केले आहेत.

या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेत्यांनी पींकावरील एमएसपी, शेतकरी आत्महत्या, पिकांना रास्त भाव आणि निर्यात बंदी असे मुद्दे उपस्थित करण्यात आले. तसेच नुकताच स्थायी समितीचा अहवाल समोर आला असून त्यात देशातील कृषी क्षेत्राची चिंता वाढली असून कृषी क्षेत्रासाठी 1 लाख कोटी रुपयांहून अधिक निधी वापरला गेला नाही तर तो सरेंडर करण्यात आल्याचा गौप्यस्फोट काँग्रेस पक्षाने केला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना काँग्रेस नेते म्हणाले की, सध्याच्या सरकारच्या कार्यकाळात एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून, दररोज 30 शेतकरी आत्महत्या करत आहेत. तर दुसरीकडे, 14.5 लाख कोटी रुपयांची कॉर्पोरेट कर्जे ही देशात माफ करण्यात आले मग शेतकऱ्यांसाठी दिलेला निधी का सरेंडर केला जात आहे? ते कॉर्पोरेट घराण्यांच्या कल्याणासाठी वापरता येतील का? 2014 ते 2022 या काळात भाजप सरकारच्या काळात 1 लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या पैशातून शेतकर्‍यांना दिलासा देऊन शेतकर्‍यांचे प्राण वाचू शकले नसते का? असा सवाल काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

Farmers Issues | दरवर्षी कृषी बजेटमध्ये घट

तसेच, देशात कृषी अर्थसंकल्पाची जी रक्कम दाखवली जात आहे ती फसवणूक असून यामागील कारण म्हणजे ती रक्कम खर्च होत नाही. तर दुसरीकडे, देशाच्या एकूण अर्थसंकल्पाच्या तुलनेत दरवर्षी कृषी बजेटमध्ये घट होताना दिसत आहे. दरम्यान, यूपीए सरकारने धानाच्या एमएसपीमध्ये 134 टक्के वाढ केली होती, तर भाजप सरकारकडून केवळ 50 टक्के वाढ करण्यात आली होती.

Farmers Issues | ….अन् तेव्हा या निर्यातीवर बंदी घालण्यात येते

दरम्यान, यावेळी बोलताना काँग्रेस नेते म्हणाले की, जेव्हा जागतिक बाजारपेठेत गहू, धान आणि इतर धान्यांचे दर मिळू शकत होते, तेव्हा या निर्यातीवर बंदी घालण्यात येते. जिथे आयात करावी लागते तिथे सर्व नियम आणि कायदे ताबडतोब रोखून धरले जातात. तसेच देशातील शेतकऱ्यांवर मोदी सरकारचा हा दुहेरी आघात आहे. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी आज दिल्लीतील मुख्यालयात पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करत मोदी सरकारला घेरले होते.