Onion News | कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत
Onion News | बाजार समितीत कांद्याचे दारात घसरण होत असून, शेतकरी चिंतेत आहेत. तर कांद्याला बाजारात सरासरी एक हजार ३१० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून, त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे. त्याचबरोबर दररोज कांद्याच्या दरात घसरण होतांना दिसत आहे. गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे दर घसरण होत असून, शेतकरी आंदोलन करीत आहेत. निर्यातबंदीच्या पूर्वी कांद्याचे दर चार हजारांवर होते, मात्र आता दर एक हजाराच्या देखील खाली गेले आहेत.
कांदा निर्यातबंदीनंतर दररोज कांद्याच्या दरात घसरण होत आहे. निर्यातबंदीच्या निर्णयापूर्वी चार हजारांवर असणारे कांद्याचे दर आता हजाराच्या खाली आले आहे. कांदा आता सात महिन्यानंतर नीच्चांकी दरावर आहे. तर नाशिक जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला १००० ते १२०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. कांदा पिकातून उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. यामुळे कांद्यावर लादलेली निर्यातबंदी उठवण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
Onion News | निर्यातबंदीनंतर आता बुरशीजन्य रोगामुळे कांदा उत्पादकांवर रडण्याची वेळ!
त्याचबरोबर, येवला बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी घसरण बघायला मिळत आहे. कांद्याचे भाव आता ९०० ते १००० रुपये प्रति क्विंटलवर आले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कांद्याचे भाव १६०० रुपये तर आज सरासरी ८०० ते ९५० रुपये भाव मिळत आहे. त्यामुळे कांदा पीक शेतकऱ्यांकडून तोट्यात विक्री केला जात आहे. यामुळे शेतकरी निराश झाले आहेत. कांद्याला जास्तीत जास्त १०६५ सरासरी ९५० तर कमीत कमी ४०० रुपये बाजार भाव मिळाला होता. (Onion News)
इतर शहरांसह सोलापुरात देखील कांद्याचे दर घसरल्याने, शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटसमोरच रस्त्यावर कांदा फेकत निषेध व्यक्त केला आहे. तसेच शेतकरी थेट बाजार समितींच्या गेट समोर आंदोलन करीत आहेत. कांद्याला बाजारात १ ते २ रुपयेपर्यंत भाव मिळत असून, शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.
Onion News | कांद्याची आवक वाढली; असा मिळतोय दर…
Onion News | शेतकरी इतर पिकांनकडे वळले..
कांदा हा नगदी पीक मानला जातो. त्यामुळे मनमाड, मालेगाव आणि नाशिकसह इतर जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकरी कांद्याची लागवड करत असतात. मात्र, यावेळी कांदा पीक असलेल्या भागात हरभरा आणि ज्वारीचा मोठ्या प्रमाणात लागवड झाली आहे. त्याचबरोबर हजारो शेतकऱ्यांनी कांद्या पीक न लावता हरभरा आणि ज्वारीला प्राधान्य दिले आहे. कांद्याच्या भावात होणारी घसरण आणि निर्यातबंदीमुळे शेतकरी इतर पिकांनकडे वळले आहेत.
केंद्र शासनाचा कांद्या बाबत धरसोडीचं धोरण आणि कांदा पीक घेण्यासाठी वाढत चाललेला खर्च हे देखील एक कारण आहे. तर नाशिक जिल्ह्यातील लाल कांद्यासह गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील कांदाही बाजारात येण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे आता तरी कांदा निर्यातबंदी उठवावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. (Onion News)