Goverment Scheme | शेतकऱ्यांसाठी सरकार करणार ‘या’ मोठ्या योजनांची घोषणा


Goverment Scheme | येत्या १ फेब्रुवारी रोजी देशाच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या शेतकऱ्यांसाठी काही मोठ्या योजनांची घोषणा घोषणा करण्याची शक्यता आहे. यात पीएम किसानपासून ते आयुष्मान भारत यापर्यंतच्या योजनांची अर्थसंकल्पात घोषणा केली जाऊ शकते. दरम्यान, यानुसार आता ‘आयुष्मान भारत‘ या योजनेची रक्कम ही दुप्पट केली जाऊ शकते. यामागे कारण असे की, योजनेच्या लाभार्थ्यांना कर्करोग व प्रत्यारोपण यासारख्या सुविधांचाही लाभ घेता येईल. तसेच सरकार यात ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी’ या योजनेचे म्हणजेच मनरेगाचे बजेट हे तब्बल ४७ टक्क्यांनी वाढवण्यात येणार आहे. (Goverment Scheme)

शेतीशी संबंधित योजनांचाही समावेश

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारीला ‘सहावा अर्थसंकल्प’ सादर करतील. २०२४ हे वर्ष सार्वत्रिक निवडणुकिंचे वर्ष असल्यामुळे निर्मला सीतारामन हा अंतरिम अर्थसंकल्प जाहीर करणार आहेत. यावर्षी लोकसभा निवडणूक संपल्यानंतर नव्या मंत्रिमंडळात सर्वसाधारण अर्थसंकल्प हा त्यावेळी जाहीर करण्यात येईल. अर्थमंत्री सीतारामन यांनी याआधीच सांगितले की, “यावेळी बजेट हे जास्त मोठे नसेल. तथापि, केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये बदल होणार असल्याचे अनेक माध्यमांच्या अहवालात नमूद करण्यात आले असून, यामध्ये शेतीशी संबंधित असलेल्या काही योजनांचाही समावेश असणार आहे. यात समावेश असलेल्या योजना पुढीलप्रमाणे…

Farmer Scheme | ‘ही’ मोहीम शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार राबविणार

Goverment Scheme | पीएम किसान योजना

गेल्या २०२३ या वर्षात केंद्र सरकारने पीएम किसान योजनेवर तब्बल ९०,००० कोटी रुपये खर्च केले होते. दरम्यान, २०२५ या पुढील आर्थिक वर्षासाठी, ग्रामीण विकास मंत्रालयाने केंद्राने या योजनेसाठी १.१ ट्रिलियन इतके रुपये वाटप करण्यास सांगितले होते. CNBC-TV18 च्या एका अहवालानुसार, पीएम किसान या योजनेच्या अंतर्गत देशातील प्रत्येक शेतकऱ्याला ६,००० रुपयांवरून 8,000 रुपये प्रति वर्ष इतकी वाटप करण्यात आली होती. दरम्यान, आता हा निधी आणखी 2,000 रुपयांनी वाढवला जाण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणातही अधिकृत निर्णय झालेला नाही. तसेच फेब्रुवारी ते मार्च या दरम्यान ‘पीएम किसान’ या योजनेचा १६ वा हप्ता जारी केला जाऊ शकतो. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात १५ वा हप्ता जारी करण्यात आलेला होता.(Goverment Scheme)

Farmer Scheme | मराठा आंदोलनामुळे शेतकऱ्यांचे अनुदान लांबणीवर..?

आयुष्मान भारत योजना

आयुष्मान भारत या योजनेच्या माध्यमातून तब्बल ५ लाखांपर्यंतचे मोफत उपचारांची सुविधा देण्यात येते. केंद्र सरकार या आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत आरोग्य कवचात दुप्पटीने वाढ होऊ शकते, अशी माहिती समोर आली आहे. तसेच ‘प्रधानमंत्री जन आरोग्य’ या योजनेंतर्गत सुरू केलेल्या या आयुष्मान भारत योजनेच्या अंतर्गत, तब्बल ५ लाखांच्या उपचारांची सुविधा दिली जात होती. जी १० लाख रुपायांपर्यंत वाढवताही येते. पीटीआय वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, १ फेब्रुवारी रोजी झाइर करण्यात येणाऱ्या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या निर्णयाची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.(Goverment Scheme)