Onion Export | …नाहीतर गांजा लागवडीची परवानगी द्या; संतप्त शेतकऱ्यांची मागणी


Onion Export | पिकांना योग्य दर मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली.

Onion Export |  कांद्याची आवक ही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर हे प्रति क्विंटर तब्बल २०० रुपयांनी खाली आले आहेत. कांदा राद्वातच होता. मात्र, आता कोथिंबीरीलाही योग्य दर मिळत नसल्याने आता शेतकऱ्यांवर कोथिंबीर रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे.  दरम्यान, भाव मिळत नसल्याने सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत संतप्त शेतकऱ्यांनी कोथिंबीर रस्त्यावर फेकली आहे. (Onion Export)

कांद्याची आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर हे प्रति क्विंटल २०० रुपयांनी घसरले. तर, मंगळवार रोजी कांद्याला सरासरी १२०० ते १४०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळत होता. मात्र आता कांद्याला प्रति क्विंटल ८०० ते १२०० रुपये असा भाव मिळत आहे. कांदा निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान, भाव कमी मिळत असल्याने सोलापूर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी गोंधळ घातला होता. (Onion Export)

Onion Export | चिंताजनक! कांदा निर्यातबंदी वर्षभर राहणार कायम…?

आवक वाढल्यामुळे कांद्याचे भाव घसरल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. यामुळे आक्रमक शेतकऱ्यांनी थेट कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रवेशद्वार बंद करण्याचा पवित्रा घेतला. पण पोलिसांनी मध्ये हस्तक्षेप केला आणि संतप्त शेतकऱ्यांना बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीत आणले आहे. यानंतर बाजार समितीच्या प्रशासकीय इमारती समोर ठिय्या आंदोलन करत शेतकऱ्यांनी केंद्र सरकार व बाजार समितीच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच झालेले सर्व सौदे रद्द करत पुन्हा नव्याने सौदे करण्याची शेतकऱ्यांची मागणीही आक्रमक शेतकऱ्यांनी यावेळी केली आहे. 

Onion Export Ban | देशातील कांदा निर्यातबंदी ठरतेय पाकिस्तानसाठी मोठी संधी…!

Onion Export | गांजा लागवडीची परवानगी द्या…

कांदा निर्यातबंदी लागू केल्यानंतर कांद्याचे भाव हे सरसर खाली आले. दरम्यान, आता कांद्याच्या पाठोपाठ कोथिंबीरीलाही भाव मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कोथिंबीर थेट रस्त्यावर फेकली. कष्टाने पिकवलेल्या पिकांना कवडीमोल भाव मिळत असल्याने गाडी भाड्याचाही खर्च निघत नाही. बाजारात आलेल्या कोथिंबीरीपैकी अर्ध्याच्यावर कोथिंबीरीला फक्त एक रुपये प्रति पेंडी दर मिळत होता. तर काही व्यापारी कोथिंबीर घ्यायलाही तयार नव्हते. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी कोथिंबीर रस्त्यावर फेकली तर, काहींनी लोकांना मोफत वाटली. कोथिंबीरच नाहीतर, मेथीलाही फक्त एक रुपये प्रति पेंडी भाव मिळत आहे. दरम्यान, यावर सरकारने तोडगा काढावा. नाहीतर, आम्हाला गांजा लागवडीची परवानगी दिली जावी अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांनी केली आहे.  (Onion Export)