Onion News | जगभरात ‘या’ कांद्याची मागणी वाढली…


Onion News | ‘या’ प्रकारच्या कांद्याची आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढली.

Onion News | यावर्षी कांद्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगलेच रडवले होते. आधीच पावसाची वाट पाहत पाहत कांद्याचे उत्पादन उशीरा आणि कमी आले. त्यानंतर अवकाळी कांद्याला झोडपले. या अवकाळीमुळे काही शेतकऱ्यांचा कांदा वाहून गेला. तर, काहींचे कांदे चाळीतच सडले. मात्र, आता तंत्रज्ञानाच्या वापरामुळे कांदा सडण्याचे टेन्शनच संपले आहे. तसेच यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.

निर्जलित कांद्याची मागणी ही दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये कांद्याला सर्वप्रथम वाळवले जाते आणि नंतर तो वापरात आणला जातो. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्च कमी होतो आणि साठवणुकीदरम्यान होणाऱ्या नुकसानीपासूनही कांदा वाचतो. आपल्या देशातील कांदा हा नेहमीच कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेचा विषय असतो. सध्या केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदीमुळे भारतातील कांदा जगभरात चर्चेत आहे. (Onion News)

Onion News | कांदा शेतकऱ्यांना पुन्हा रडवणार..?

जगातील सर्वात मोठा कांदा उत्पादक देश म्हणून भारताकडे पहिले जाते. नाशिक आणि सोलापूर या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र, साठवणुकीदरम्यानच २५ ते ३० टक्के कांद्याचे उत्पादन नष्ट होते. दरम्यान, यामुळेच जगभरात निर्जलित कांद्याची मागणी ही वाढत चालली आहे. यामध्ये कांदा वाळवला जातो, जो नंतर वापरला जातो असे केल्याने वाहतुकीचा खर्च तर कमी होतोच शिवाय साठवणुकीदरम्यान होणाऱ्या मोठ्या नुकसानीपासूनही कांदा वाचतो.

यामुळे वाढली निर्जलित कांद्याची मागणी…

त्यामुळे कांदा हे महाराष्ट्रातीलच नाही तर, भारतातीलही महत्त्वाचे पीक आहे. ताजे कांद्याऐवजी आता निर्जलित कांदा हा जगात आणि देशातही आता वापरला जातो. तसेच, निर्जलित कांद्यामध्ये सुगंध हा सारखाच असतो. कांद्याचे तुकडे हे प्रक्रिया केलेल्या अन्नात सहज वापरता येतात त्यामुळे या कांद्याची मागणी वाढली आहे. तर, निर्जलित कांद्याचा मुख्य फायदा म्हणजे त्याचा साठवणीचा कालावधी हा तुलनेने जास्त असतो. त्यामुळे हा कांदा वर्षभर आणि ऑफ सीझनही उपलब्ध असतो. दरम्यान, या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना तुलनेने जास्त नफा मिळू शकतो. (Onion News)

Onion News | कांद्याची आवक वाढली; असा मिळतोय दर…

Onion News | कोठे केला जातो वापर..?

भारतीय कृषी संशोधन संस्था आणि दिल्लीच्या अन्न, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाने कांद्याचे निर्जलित तुकडे आणि पावडरमध्ये करण्याचे तंत्र विकसित केले असून, कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की, या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कांदा सामान्य स्थितीत ६ महिने तर, कमी तापमानामध्ये तब्बल एक वर्ष कोणतेही नुकसान न होता साठवता येतो. कांद्याच्या निर्जलित तुकड्यांचा वापर हा पॅक्ड फूड्सशी संबंधित उद्योग, औषध उद्योग, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स इत्यादींमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात केला जातो. निर्जलित कांदे हे वजनाने हलके असतात. हे पॅक करणेही अगदी सोपे असते. तसेच ताज्या कांद्यापेक्षा कमी तापमानात हा कांदा जास्त काळ टिकतो. त्यामुळे याला बाजारात प्रचंड मागणी आहे. पिझ्झा, ग्रेव्ही तसेच इतर अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये हा कांदा वापरला जाऊ शकतो. (Onion News)