Farmer Scheme | या वर्षी सरकार शेतकऱ्यांना काय देणार..?


Farmer Scheme | शेतकऱ्यांसाठी यावर्षी सरकार कोणत्या तरतुदी करणार.

Farmer Scheme | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर का होईना, पण यावर्षी सरकार शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष देणार आहे. शेतीतून उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजनांमध्ये आर्थिक लाभ वाढण्याची शक्यता आहे. यासंबंधीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन या १ फेब्रुवारीला अंतिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Farmer Scheme | नेमकं काय करणार..?

२०२३ आणि २४ च्या अर्थसंकल्पात क्रेडीटसाठी २० कोटींची रुपरेषा आखण्यात आली आहे. त्यातील ९० टक्के रक्कम वितरित करण्यात येणार आहे. तसेच, अर्थसंकल्पात अर्थ मंत्रालयाने १८ कोटींपेक्षा जास्त रक्कम कृषी कर्ज म्हणून वितरित केलेली आहे. २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या संमारंभात यावर्षीच्या अर्थसंकल्पात तरूण, महिला, शेतकरी आणि गरीब अश्या चार प्रमुख गटांसाठी धोरणांवर लक्ष केंद्रित करणार आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमन १ फेब्रूवारी रोजी सलग सहावे अर्थसंकल्पीय भाषण सादर करणार आहेत. प्रमुख चार गटांवर लक्ष केंद्रित असणार आहे, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले.(Farmer Scheme)

Farmer Scheme | ‘ही’ मोहीम शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार राबविणार

Farmer Scheme | काय असतील तरतुदी..?

१) शेतकऱ्यांना अटी पूर्ण करून कर्ज सहज मिळू शकते. कृषी कर्जाचे लक्ष २२ लाख कोटी रुपयांवरून २५ लाख कोटी रुपये वाढण्याची शक्यता आता वर्तविण्यात आली आहे.

२) २० लाख कोटी रुपये कृषी कर्ज गेल्या डिसेंबर मधील आर्थिक वर्षात वितरित करण्यात आले आहे.

३) शेतकरी सन्मान योजनेत रक्कम वाढण्याची शक्यता आहे. सध्या ६ हजार रुपये दरवर्षी शेतकऱ्यांना मिळतात.

३) १.२५ लाख कोटी रुपयांवर ही तरतूद २०२३ आणि २४ च्या अर्थसंकल्पात केली आहे.

४) सिंचन, कृषी विमा तसेच ग्रामीण रोजगाराकडे सरकार विशेष लक्ष देऊ शकते. असा अंदाज आहे. ग्रामीण क्षेत्रासाठी असलेल्या योजनांवरील खर्च वाढविण्याची शक्यता आहे.

Farmers Scheme | ‘या’ योजनेसाठी सरकारने केली जोरदार तयारी!

आत्ताच्या सत्ताधारी पक्षातील भाजप सरकार १२ वा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तसेच, निवडणूक वर्ष असल्याने हा अर्थसंकल्प अंतरिम असणार आहे. दरम्यान, २०२४ च्या सार्वत्रिक निवडणूकांनंतर पूर्ण अर्थसंकल्प सादर होण्याची अपेक्षा आहे. (Farmer Scheme)