Onion News | सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक वाढली; सरासरी भावात 700 रुपयांनी घट


Onion News | गेल्या आठवड्यात सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत अडीच हजार रुपयांचा सरासरी भाव मिळणारा कांदा सध्या 1800 रुपये क्विंटल या दराने विकला जात आहे. कांद्याची आवक वाढल्याने दर घसरल्याची माहिती बाजार समितीने दिली जात आहे. सोमवार दि. 28 ऑक्टोबर रोजी बाजार समितीत 621 गाड्या कांदा आला होता. त्याला सरासरी 800 रुपये तर सर्वाधिक दर 5 हजार सहाशे पर्यंत भाव मिळाला होता. तर सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 32000 हेक्टर वर कांदा लागवड झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेकांनी कांदा लागवड केली होती. परंतु सततच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचा कांदा जागेवरच खराब झाला. त्यात पावसामुळे ज्या शेतकऱ्यांना वेळेत कांदा काढता आला नाही. या काळा पडलेला कांद्या 200 ते 1,800 रुपये क्विंटल या दराने विकला जात आहे.

Onion News | अफगाणिस्तान नंतर आता तुर्की आणि इजिप्त मधून 120 टन कांद्याची आयात

कांद्याच्या सरासरी भावात 700 रुपयांनी घट

तर सप्टेंबरमध्ये अनेकांनी पावसाचा अंदाज घेत कांद्याची लागवड केली असता नोव्हेंबरअखेरीस बाजारात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे. त्यावेळी आवक आणखी वाढणार नसून सर्वाधिक भाव जरी 5,600 रुपये असला तरी तो अगदी थोड्या कांद्यासाठी मिळाला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत सध्या कांद्याचा सरासरी भाव 700 रुपयांनी कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Onion News | सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक; आगामी काळात दरात सुधारणा होण्याची शक्यता

बाजार समितीत कांद्याचे आवक वाढली

सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून अवघे 20 हजार रुपये रोखीने दिले जातात. त्यांच्या विकलेल्या कांद्याची किंमत 50 हजार पर्यंतच रोखीने दिले जात आहेत. तर व्यापाऱ्यांकडून पणन कायद्यातील तरतूद पायदळी तुडवून उर्वरित रकमेकरिता 15 ते 20 दिवसांच्या मुदतीचा धनादेश दिला जात आहे. तर सध्या सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक दिवसेंदिवस वाढत असून शुक्रवारी 400 तर शनिवारी 53 आणि सोमवारी 621 गाड्यांच्या आवक झाली होती. या पार्श्वभूमीवर आता कांदा घेऊन येणाऱ्या वाहनांना रात्री 12 ते 1 पर्यंत कांदा मार्केटमध्ये वाहने घेऊन जाऊ दिली जात नाहीत. तोवर त्यांना भुसार मार्केटमध्ये थांबावे लागत असून पूर्वीचा शेतमाल उचलून जागा झाल्यावरच त्या वाहनांना तेथे सोडले जात आहे. सकाळी दहा नंतर कांद्याचा लिलाव सुरू होतो. अशी माहिती बाजार समितीकडून मिळाली आहे.