Onion Export | चिंताजनक! कांदा निर्यातबंदी वर्षभर राहणार कायम…?


Onion Export | 7 डिसेंबर रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केला आणि या निर्यातबंदी विरोधात राज्यासह नाशिक जिल्ह्यात या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवण्यात आला. नाशिक जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून कांदा निर्यातबंदी हा प्रश्न हा पेटलेला असताना संपुर्ण नाशिक जिल्ह्यात विविध संघटनांनी तसेच राजकीय पक्षांनी कांदा निर्यातबंदी या विषयावर आवाज उठवला मात्र हे सगळं पूर्णपणे फोल ठरल्याचं चित्र सध्या स्पष्ट होत आहे.

नाशिक जिल्ह्यात आधी दुष्काळी परिस्थिती त्यानंतर अवकाळी आणि गारपिटीने कांदा उत्पादकांचं जगणं अवघड केलेलं असताना केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर घणाघात केला. आता कांदा निर्यातबंदी हा निर्णय मागे घ्यावा अशी सातत्त्याने मागणी करून देखील सरकार जाणूनबुजून या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतंय का? असा सवाल सध्या उपस्थित होत आहे.

Onion Export
Onion Export

Onion Export | कांदा निर्यातबंदी वर्षभर कायम राहणार?

दरम्यान, केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय मागे घ्यावा, अशी शेतकऱ्यांची मागणी असून मात्र, सध्या तरी सरकार कांदा निर्यातबंदी मागे घेतली जाईल, असे चित्र दिसत नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कांद्याच्या निर्यातीवरील बंदी ही २०२४ या वर्षभर कायम राहू शकते. तर सध्या केंद्र सरकार कांदा निर्यातबंदी हटवण्याच्या मनस्थितीत दिसत नसून कांद्यावरील निर्यातबंदी ही २०२४ या वर्षभरात मागे घेतली जाणार नाही असा सुत्रांनी दिलेल्या माहीतीवर आधारीत मीडिया रिपोर्ट्सनुसार दिसत आहे.

कांदा निर्यातबंदी झाल्यानंतर कांद्याचे दर दिवसेंदिवस घसरत असून याचा मोठ्या प्रमाणात फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे. या निर्यातबंदी विरोधात शेतकरी आक्रमक होत नाशिक जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली मात्र तरीही कांदा निर्यातबंदीवर तिळमात्रही परिणाम झाला नसल्याचं चित्र सध्या स्पष्ट झालं आहे. आता पुन्हा कांदा निर्यातबंदीविरोधात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आणखी किती लढावं लागणार? हे पाहणं महात्वाचं असेल.