Onion Export | मोदींचे पाय महाराष्ट्रात पडण्याआधी कांद्यावरील निर्यात बंदी हटवली…


Onion Export | सध्या देशात लोकसभा निवडणुक सुरू असून, यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोल्हापूरमध्ये प्रचार सभेसाठी येणार आहेत. मात्र, त्यांच्या आगमनाआधीच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना गुड न्यूज दिली आहे. नुकतंच केंद्र सरकारने गुजरातच्या पांढऱ्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली. मात्र, महाराष्ट्राच्या उन्हाळ आणि ळाळ कांद्यावर निर्यात बंदी ठेवली. त्यामुळे गुजरात आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत भेदभाव का..? असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत होता.

गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांकडून कांदाप्रश्नी केंद्र सरकारवर टिका केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय जाहीर केला असून, अखेर आता महाराष्ट्रातील कांद्याच्या निर्यातीस परवानगी देण्यात आली आहे. यानुसार, 99 हजार 150 मेट्रीक टन कांद्याची निर्यात होणार आहे. यामुळे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या उन्हाळ कांद्याला चांगला दर मिळणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात त्यांना विरोधाला सामोरे जावे लागू नये, म्हणून की काय मोदींच्या आगमनाआधीच कांदा निर्यात बंदी उठवण्यात आली आहे. (Onion Export)

Onion Export Ban | कांदा प्रश्नावर आवाज न उठवणाऱ्या नेत्यांनो आता मतं मागायला येऊ नका

Onion Export | 6 देशात कांदा निर्यात करणार

यानुसार, केंद्र सरकारने आता 6 देशात कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. यात बांग्लादेश, युएई, भूतान, बहरीन, मॉरिशस व श्रीलंका या देशांचा समावेश आहे. तर, 2 हजार मेट्रीक टन पांढरा कांदा आखाती आणि युरोपियन देशात निर्यात केला जाणार आहे. दोन दिवसांपूर्वीच गुजरातच्या 2 हजार मे. टन कांदा निर्यातीला केंद्र सरकारकडून परवानगी देण्यात आली होती. याविरोधात महाराष्ट्रातील शेतकरी आक्रमक झाल्याने आज 99 हजार 150 मेट्रीक टन कांद्याची निर्यात करण्यास परवानगी देण्यात आली आहे. (Onion Export)

Onion Export Ban | केंद्राच्या ‘या’ नव्या निर्णयाचा कांदा उत्पादकांना पुन्हा फटका

कांद्यावरुन विरोधक प्रचारसभा पेटवत असल्याचे लक्षात घेऊन..

आज सकाळीच संजय राऊत यांनी कांद्याच्या प्रश्नावरुन मोदी सरकारला लक्ष्य केलं होतं. यामुळे राज्याच्या राजकारणात महाराष्ट्र विउद्ध गुजरात असा वाद निर्माण झाला होता. विरोधी नेते कांद्यावरुन प्रचारसभा पेटवत असल्याचे लक्षात घेऊन कदाचित केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवली असावी. मात्र, आता अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांचा कांदा संपला असून, नाईलाजास्तव आधीच कमी दरात शेकऱ्यांना कांदा विकावा लागला होता. तर, यापूर्वी केंद्र सरकारने संयुक्त अरब अमिराती, बांग्लादेश मॉरिशस व श्रीलंका या मित्र देशांना कांदा निर्यात केला होता. आत्तापर्यंत केंद्र सरकारने 79,150 टन कांद्याची मित्र देशांना निर्यात केली आहे आणि आता आणखी 6 देशांना कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.