Onion Export | 7 डिसेंबर रोजी केंद्र सरकारने देशात कांदा निर्यातबंदी केली आणि या निर्यातबंदीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत असून आता कांद्याच्याबाबात एक मोठी अपडेट समोर येत आहे. यातच नेपाळमधील सरकारने भारतीय सरकारला कांदा निर्यात सुरू करावी अशी विंनती केली होती यामुळे भारतीय कांदा नेपाळ देशात निर्यात सुरू करण्यात आली.
दरम्यान, नेपाळ देशात कांद्याच्या वाढत्या किंमतीने लोकांना सर्वाधिक त्रास दिला असून महागाईमुळे लोकांचे स्वयंपाकघराचे बजेट बिघडले आहे. भारत सरकारने निर्यातीवर बंदी घातल्याने नेपाळमध्ये कांद्याचे भाव सातव्या गगनाला भिडल्याचे बोलले जात असून त्यामुळे कांदा तस्करांची चांगलीच कमाई सुरू आहे. कांदा तस्कर हे भारतातून नेपाळमध्ये अवैधरित्या कांद्याची तस्करी करत असून त्यामुळे नेपाळच्या बाजारपेठेत कांद्याचा पुरवठा सुरळीत झाला आहे.
Onion Export | भारतातून नेपाळमध्ये अवैधरित्या निर्यात होणारा कांदा जप्त
नेपाळ देशात कालीमाटी फळे आणि भाजीपाला बाजार विकास मंडळाचे माहिती अधिकारी बिनय श्रेष्ठ यांनी सांगितले की, कालीमाटी बाजारात नेहमीप्रमाणे कांद्याचा पुरवठा होत असून एकूण कांद्याची ९० टक्के आवक ही भारतातून होत आहे. दरम्यान, शनिवारी रुपंदेही पोलिसांनी भारतातून नेपाळमध्ये अवैधरित्या होणाऱ्या कांद्याची 28 पोती म्हणजेच 1700 किलो कांदा जप्त केल्याचे वृत्त समोर आले आहे.
कांद्याप्रमाणेच गेल्या वर्षी भारतात टोमॅटोचे भाव कडाडलेले होते. टोमॅटोचा दर 250 रुपयांवरून 300 रुपये किलो झाला होता. मात्र त्यावेळी नेपाळमध्ये टोमॅटो स्वस्त होते. त्यानंतरही तस्कर नेपाळमधून टोमॅटोची भारतीय बाजारपेठेत तस्करी करत होते. विशेष म्हणजे त्यावेळी बिहार आणि उत्तर प्रदेशातील तराई भागात नेपाळी टोमॅटोची आवक वाढलेली होती.