Drone Scheme | ड्रोनद्वारे फवारणी कराल तर फवारणीचा खर्च उचलणार सरकार


Drone Scheme | सध्या देशात आधूनिक शेतीवर जास्तीत जास्त भर दिला जात असून देशात यानिगडीत अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. यातच, नॅनो युरिया आणि डीएपी आणल्यानंतर सरकार आणि तज्ज्ञांनी देशात ड्रोनच्या वापरावर भर देण्यास सुरुवात केली असली मात्र तरीही, ड्रोन खरेदी करणे खूप महाग असल्याने त्याच्या उद्योगाशी निगडीत लोकांच्या अपेक्षाप्रमाणे ड्रोनची खरेदी होत नाही. त्यामुळे आता ड्रोन भाड्याने घेऊन शेती करण्याची चर्चांना उधान आलं आहे.

इफको या रासायनिक खत निर्मिती कंपनीने 2500 ड्रोन खरेदी केले असून ते भाड्याने दिले जाऊ शकतील आणि पिकांवर युरिया, डीएपी आणि कीटकनाशकांची फवारणी करता येईल असा ड्रोन दीदी योजनेचा मुळ हेतू आहे. दरम्यान, हरियाणाचे कृषी मंत्री जेपी दलाल यांनी याबाबत एक मोठी गोष्ट सांगितली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मंत्री जेपी दलाल यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, शेतीत ड्रोनद्वारे फवारणीसाठी शेतकऱ्याला एकरी 100 रुपये मोजावे लागणार असून, उर्वरित खर्च सरकार उचलणार आहे. त्यामुळे ड्रोनच्या सहाय्याने फवारणीचा कल वाढणार असून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कीटकनाशक फवारणीसाठी कृषी विभागाकडून विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून इफकोने तयार केलेला नॅनो युरिया आणि डीएपी ड्रोनच्या माध्यमातून वापरावे आणि विषमुक्त शेती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

Drone Scheme | जनावरांसाठी रुग्णवाहिका सेवा

हरियाणाचे पशुसंवर्धन मंत्री म्हणाले की, लवकरच माणसांप्रमाणे प्राण्यांसाठी रुग्णवाहिका सेवा सुरू होणार आहे आणि तसेच यासाठी हरियाणा सरकारने 70 वाहनांची खरेदी केली असून लवकरच 130 वाहनांची खरेदी केली जाणार आहे. ही रुग्णवाहिका सेवा सुरू झाल्यानंतर पशुधन जखमी किंवा गंभीर आजारी पडल्यास, पशुवैद्य घटनास्थळी जाऊन आजारी किंवा जखमी जनावरांवर फक्त एका फोनद्वारे उपचार करता येणार आहे.