Onion Auction | कांदा लिलाव सुरू करण्यावरून राडा अन् दगडफेक; शेतकरी जखमी


Onion Auction | गेल्या सात दिवसांपासून लेव्हीप्रश्नी नाशिकमधील १५ बाजार समित्या बंद होत्या. दरम्यान, बाजार समित्या बंद असल्याने कांदा लिलावाबाबत कोणताही तोडगा निघत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत होते. हे लक्षात घेऊन शेतकरी आणि व्यापारी यांच्यात चर्चा झाली आणि शेतकरी संघटनांच्या पाठिंब्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी खासगी जागेत कांदा लिलाव सुरू करण्यात आले आहेत. (Onion Auction)

Onion Auction | तूफान राडा अन् दगडफेक

मात्र, नाशिकमधील येवला येथे खाजगी कांदा लिलाव सुरू करण्यावरून हमाल मापारी गट आणि शेतकऱ्यांमध्ये तूफान राडा झाला. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली आणि यात एक शेतकरी जखमी झाला आहे. दरम्यान, एवढेच नाहीतर, या घटनेचे चित्रीकरण करणाऱ्या पत्रकारांनाही संबंधितांनी धक्काबुक्की केली. नाशिकमधील बाजार समित्यांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून व्यापारी व हमाल मापाऱ्यांच्या वादामुळे कांदा लिलाव बंद ठेवण्यात आले होते. यामुळे येवला बाजार समितीही बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाचा लिलावही करता येत नव्हता. दरम्यान, यासाठी बाजार समितीने लिलाव सुरू करण्याबाबत बैठक बोलावली होती.

Onion News | देवळा येथे खाजगी जागेवर कांदा लिलाव सुरू; असा मिळतोय दर…

बैठकीत तोडगा नाहीच

या बैठकीला संचालक मंडळासह व्यापारी, शेतकरी व हमाल मापारी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. बाजार समितीच्या वतीने जसे सुरू होते. त्याच पद्धतीने पुन्हा लिलाव सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. मात्र, व्यापारी संघटनेला हा प्रस्ताव मान्य नसल्याने ही बैठक फेल ठरली. त्यामुळे यानंतर बैठकीत खासगी जागेत कांदा लिलाव करण्याबाबत चर्चा झाली. यानंतर शेतकरी व व्यापाऱ्यांनी एकमताने येवला- मनमाड मार्गावर असलेल्या खासगी जागेवर कांदा लिलाव सुरू करण्याचा निर्णय घेतला.

मात्र, लिलाव सुरू केल्यामुळे हमाल मापारी गट आक्रमक झाले आणि त्यानंतर येथे वाद झाले. दरम्यान, याठिकाणी एका अज्ञाताने केलेल्या दगड फेकीत नाटेगाव येथील एका शेतकऱ्याच्या डोक्याला दगड लागल्याने संबंधित शेतकरी जखमी झाला आहे. यावेळी या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण करत असलेल्या एएनआय वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी आणि छायाचित्रकार यांनाही जमावाकडून धक्काबुक्की करण्यात आली. यानंतर तातडीने पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. (Onion Auction)

Onion Export Ban | केंद्राच्या ‘या’ नव्या निर्णयाचा कांदा उत्पादकांना पुन्हा फटका