Krishi Bhavan | नाशिकमध्ये आणखी एक ‘कृषि भवन’ साकारणार


Krishi Bhavan | राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला तालुका कृषि अधिकारी, तीन मंडल कृषि अधिकारी कार्यालय व फळरोपवाटिकेसह कृषि भवन बांधकामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यासाठी १३ कोटी ८५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यामुळे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा सहज आणि सुलभरीत्या उपलब्ध होणार आहे. (Krishi Bhavan)

Krushi Bhavan | आता नाशिकच्या शेतकऱ्यांना कृषि विषयक कामांसाठी फिरण्याची गरज नाही

Krishi Bhavan | कृषि भवनात असणार या सुविधा

येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या योजनांचा लाभ मिळावा. तसेच शेतीसंबंधी सर्व प्रशासकीय कामकाज करण्यासाठी एकाच छताखाली सर्व कृषि भवन कार्यालय असावे, या विचारधारेतून मंत्री छगन भुजबळ यांचा राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार येवला कृषि अधिकारी कार्यालय व तीन मंडल अधिकारी कार्यालय व रोपवाटिकेसह कृषि भवन बांधकामास प्रशासकीय मान्यता प्राप्त होऊन त्यासाठी १३ कोटी ८५ लाखांचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना कृषि विषयक कुठलेही काम करण्यासाठी विविध कार्यालये फिरण्याची गरज नाही. आता एकाच छताखाली शेतकऱ्यांची सर्व शासकीय कामे होणार आहेत. (Krishi Bhavan)

Shetkari Bhavan | शेतकऱ्यांनो ही बातमी तुमच्या फायद्याची; वाचा सविस्तर

असे असेल कृषि भवन

या कृषि भवनामध्ये कृषि भवन इमारत, येवला तालुक्यातील शेतकऱ्यांना फळप्रक्रिया व इतर प्रशिक्षण देण्यासाठी सुसज्ज प्रशिक्षण हॉल बांधण्यात येणार आहे. तसेच गॅस पाईप लाईन, बायो डिझास्टर यंत्रणा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर लाईट, स्ट्रीट लाईट, फर्निचर, संरक्षण भिंत, पेव्हर ब्लॉक, सीसीटीव्ही, शौचालय, पार्किंग, अंतर्गत रस्ते, पाण्याची टाकी, पंप यासह विविध कामांचा समावेश आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार असून, याअंतर्गत शेतकऱ्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध होणार आहे. (Krishi Bhavan)