Grapes News | द्राक्ष उत्पादकांसाठी सरकारचा मोठा निर्णय; पेढे वाटून निर्णयाचे स्वागत


Grapes News | केंद्र सरकारने अचानक लादलेल्या या कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादकांसह द्राक्ष उत्पादकांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले. कारण केंद्र सरकारने अचानक लादलेल्या या कांदा निर्यात बंदीमुळे बांग्लादेशने त्यावेळी इतर देशांतून कांद्याची आयात करून आपली गरज भागवली. मात्र, त्यानंतर भरतातून येणाऱ्या द्राक्ष पीकावरील शुल्क वाढवले असून, हा तोटा व्यापऱ्यांना बसत असला तरी याची फेड ही शेतकऱ्यांकडूनच केली जाते.

 मात्र, आता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय सरकारतर्फे घेण्यात आला असून, यानुसार बेदाण्याचा समावेश हा आता शालेय पोषण आहारात करण्यात आला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तर, सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी साखर आणि पेढे वाटून हा आनंद साजरा केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे बेदाण्याची मागणी वाढून दरांमध्ये सकारात्मक बदल होणार आहे. सांगली जिल्ह्यातील तब्बल पावणे तीन लाख आणि राज्यातील तब्बल सव्वा कोटी विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. (Grapes News)

Grapes Scheme |  शिंदे सरकारची द्राक्ष, डळिंबांसाठी ‘ही’ खास योजना

Grapes News | स्वाभिमानीच्या अनेक वर्षांच्या लढ्याला यश

शेतकर्‍यांच्या द्राक्ष या शेतमालाला चांगला भाव मिळावा, तसेच शालेय विद्यार्थ्यांना अधिक पोषणयुक्त आहार मिळावा यासाठी विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात बेदाण्यांचा समावेश करण्यात यावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आग्रही होती. त्यांनी सातत्याने ही मागणी लाऊन धरली होती. अखेर त्यांची ही मागणी मान्य झाली असून, स्वाभिमानीच्या या लढ्याला यश आलं आहे. तर, याबाबत शासनाने अद्यादेश देखील काढला आहे. दरम्यान, हे आमच्या लढ्याचे यश असल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केला आहे.

तसेच या बेदाण्यांची खरेदी ही व्यापार्‍याकडून न करता थेट शेतकर्‍यांकडून करावी अशी मागणीही यावेळी त्यांनी केली आहे. तसेच यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने साखर आणि पेढे वाटून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून शालेय पोषण आहारात बेदाण्याचा समावेश करण्याची मागणी केली जात होती. यासाठी मोर्चे, आंदोलनंदेखील झाली होती. तर, अखेर त्यांच्या या वर्षांच्या लढ्याला यश आले आहे.

Grapes Export | ‘रुद्राक्ष’ नगरीतील ‘द्राक्ष’ संकंटात..!

बेदाणा उत्पादकांना फायदा

राज्य सरकारच्या या शालेय पोषण आहारात बेदाणे देण्याबाबतच्या निर्णयाचा फायदा राज्यातील हजारो बेदाणा उत्पादकांना होणार आहे. सध्या द्राक्षाला योग्य भाव मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी बेदाणे प्रक्रियेचा उद्योग सुरु केला असून, मात्र, बेदाण्यांनाही भाव नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी निराश झाले होते. दरम्यान, आता शालेय पोषण आहारातच त्याचा समावेश झाल्याने बेदाणा निर्मिती करणाऱ्यांना चांगला भाव मिळणार आहे. तसेच सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांसह शालेय मुलांना विविध प्रोटीन मिळाल्याने त्यांचा बौद्धिक विकास होईल. तसेच गुणवत्ता वाढीतही लाभ होईल, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. (Grapes News)