Grapes Export | ‘रुद्राक्ष’ नगरीतील ‘द्राक्ष’ संकंटात..!


Grapes Export | नाशिक जिल्ह्याला ‘द्राक्षपंढरी’ म्हणुन ओळखलं जातं तसेच भारतातून होणाऱ्या एकूण द्राक्ष निर्यातीपैकी 55 टक्के तर महाराष्ट्रातील 75 टक्के निर्यात ही नाशिक जिल्ह्यातून होत असते. यातच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा अवकाळी तसेच गारपीटीने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. दरम्यान, जागतिक स्तरावर सुरू असलेल्या इस्त्रायल आणि हमास युद्धाची झळ आता नाशिकच्या द्राक्ष निर्यातीला बसताना दिसत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून हमास आणि इस्त्रायल यांच्यातील युद्ध सुरू असून हमास संघटनेनं इस्रायल देशावर केलेल्या हल्ल्यानंतर सुरु झालेल्या युद्धात सारं जग होरपळून निघत आहे. यातच हमासच्या गाझापट्टीवर झालेल्या हल्ल्यात जहाज उडवल्याने जहाज कंपन्यांनी लाल समुद्र आणि सुएझ कालव्यातून होणारी वाहतूक अचानकपणे थांबविली असून याचाच मोठा परिणाम भारतातून युरोपीयन देशात होणाऱ्या द्राक्ष निर्यातीवर होताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निर्यातदारांनी द्राक्ष खरेदी बंद केलेली आहे.

Grapes Export | अतिरिक्त मालवाहतुकीचा खर्च वाढणार

हमास आणि इस्त्रायल यांच्यातील युद्धामुळे सध्या अनेक जागतिक बाबींवर याचा परिणाम होत असून या युद्धाचा परिणाम सध्या नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीवर हात आहे. दरम्यान, युरोप देशात नाशिकच्या द्राक्षांची निर्यात वाहतुक होण्यासाठी 12 ते 15 दिवसांचा अतिरिक्त वेळ लागणार असल्याने लांबच्या प्रवासामुळे द्राक्षं युरोपला 21 ते 25 दिवसांऐवजी 30 ते 35 दिवसांत पोहोचू शकतील. यासर्व बाबींचा विचार करता द्राक्ष निर्यात करण्यासाठी आता देशांना खर्चाचा अतिरिक्त भार उचलावा लागणार असून लांब मार्ग तसेच युद्ध जोखीम या कारणांमुळे अतिरिक्त मालवाहतुकीचा खर्च वाढू शकतो.

काय आहे इस्रायल आणि हमासची लढाई?

गेल्या अनेक वर्षांपूर्वीच्या घडामोडीत इस्रायल आणि हमासमधल्या युद्धाची बीजे रोवलेली आहेत. इस्रायल-पॅलेस्टाईन-वेस्ट बँक आणि गाझा पट्टीचा जो भूभाग आहे, त्याठिकाणी 1948 पुर्वी ब्रिटीशांची सत्ता होती. विश्वयुद्धानंतर इस्रायल देशाची स्थापना केल्यानंतर 1948 साली निळ्या रंगाचा भूभाग इस्रायल देश म्हणून घोषित झाला मात्र इजिप्त, सीरिया, जॉर्डन आणि इराक या अरब देशांनी इस्रालयच्या निर्मितीला विरोध करत 1949 मध्ये इस्र्यालवर हल्ला केला. एकट्या इस्रायलनं चारही देशांना युद्धात पराभूत केलं. यावेळी जवळपास पूर्ण पॅलेस्टाईन इस्रायलच्या ताब्यात गेला. आज गाझा पट्टीत हमासचा कब्जा आहे आणि तिथूनच इस्रायलवर हल्ले सुरु आहेत तर दुसरीकडे इस्रायलने गाझा पट्टीतून हमासला हद्दपार करण्याचा दावा केला आहे.