PM Kisan | ‘या’ योजनेसाठी सरकारने घातली नवी अट


PM Kisan | आताच या अटीची पूर्तता करा, नाहीतर राहावे लागेल या योजनेपासून वंचित.

PM Kisan | पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १६ वा हप्ता जारी केला जाणार असून, त्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे. तर योजनेचा १५ वा हप्ता १५ नोव्हेंबर २०२३ रोजी जारी करण्यात आला होता. ज्यात ११ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात २.८१ कोटी रुपये वर्ग केले आहेत. या योजनेसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही अटी ठेवल्या आहेत.

PM Kisan | कोणत्या आहेत योजनेच्या अटी..?

सरकारी नियमांनुसार, पीएम किसान योजनेशी निगडीत शेतकऱ्यांची ई-केवायसी असणे आवशयक आहे. ई-केवायसी न केल्यास हप्त्याच्या लाभा शेतकऱ्यांना मिळणार नाही. ई-केवायसी अद्याप केली नसल्यास, तात्काळ करून घेणे गरजेचे आहे. असे आवाहन सरकारने केले आहे. तर शेतकरी जवळच्या CSC केंद्राला भेट देऊन ई-केवायसी आणि योजनेच्या निगडित कामे पूर्ण करू शकतात. शेतकरी बायोमेट्रिकच्या आधारित ई-केवायसी करू शकता. त्याचबरोबर PM किसान pmkisan.gov.in च्या अधिकृत पोर्टलला भेट देऊन शेतकरी स्वतःच्या मोबाइलला वरून देखील ई-केवायसी देखील करू शकता. याशिवाय जवळील बँकेत PM किसान ई-केवायसी करू शकतात. (PM Kisan)

PM Kisan Yojna | किसान योजनेचा हप्ता लवकरच होणार जमा

कशी आहे योजना..?

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना मोदी सरकारकडून देशातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राबवली जाते. या योजनेअंतर्गत सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेद्वारे गरजू आणि गरीब वर्गातील शेतकऱ्यांना वार्षिक हप्ता दिला जातो. सरकारकडून शेतकऱ्यांना ही रक्कम थेट खात्यात जमा केली जाते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. वर्षाला चार महिने सरकार २००० रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते. आता PM किसान योजनेच्या १६ व्या हफ्त्याची प्रतीक्षा आहे.

Crop Damage | शेतकऱ्यांनो थंडीमुळे पिके खराब होताय तर सरकार देणार भरपाई

PM किसान निधीचा सोळावा हफ्ता कधी जारी करण्यात येईल, याची शेतकऱ्यांना उत्सुकता लागली आहे. मात्र, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १६ वा हप्ता लवकरच म्हणजे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाण्याची शक्यता आहे. लवकरच पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १६ वा हप्ता जमा होणार आहे, मात्र त्याआधी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घेणं आवशयक आहे. अन्यथा योजनेच्या लाभापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागू शकते. (PM Kisan)