PM Kisan Yojna | किसान योजनेचा हप्ता लवकरच होणार जमा


PM Kisan Yojna | देशात केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. यातच, या योजनांमध्ये सर्वात प्रमुख म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि या योजनेद्वारे केंद्र सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत करत असते. देशातील शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दोन हजार रुपये केंद्र सरकारकडून देण्यात येतात. केंद्र सरकारने आतापर्यंत संपुर्ण देशातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 15 हप्ते जमा केलेले आहेत.

PM Kisan Yojna | लवकरच या योेजनेचा १६ वा हप्ता मिळणार..

दरम्यान, आता शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 16 व्या हप्त्याची वाट पाहत असून लवकरच या योेजनेचा १६ वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. पीएम किसान योजनेंतर्गत दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य म्हणुन केंद्र सरकारकडून हप्ते दिले जात असतात. केंद्र सरकारने नोव्हेंबर महिन्यात पीएम किसान योजनेचा 15 वा हप्ता वर्ग केला होता. झारखंडमधील शेतकऱ्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 व्या हप्त्याचे पैसे खात्यात वर्ग करण्यात आले होते.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून आता पुढील हप्ता म्हणजेच १६ वा हप्ता मार्च महिन्यात मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र सध्या, केंद्र सरकारने 16 वा हप्ता जारी करण्याच्या तारखेबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही.

दरम्यान, पंतप्रधान किसान योजनेच्या माध्यमातून, भारत सरकार सर्व पात्र शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2000 रुपयांची आर्थिक मदत करत असून अशा स्थितीत असे काही शेतकरी आहेत जे या योजनेचा लाभ घेण्यास पात्र नसूनही चुकीच्या पद्धतीने या योजनेचा लाभ घेत आहेत. म्हणूनच सरकारने PM किसान e-KYC ची तरतूद आणली असून, ज्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत आणि कोणते शेतकरी पात्र नाहीत हे स्पष्ट करू शकते.

PM Kisan Yojna | …तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत

आता प्रश्न असा येतो की, पीएम किसानचे पैसे त्यांच्या खात्यात येत आहेत की नाही हे शेतकऱ्यांना कळणार कसे? यासाठी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभार्थी दर्जा आणि पीएम किसान लाभार्थी यादी पाहावी लागणार आहे. तुम्हाला अधिकृत वेबसाइट PM-Kisan Samman Nidhi (pmkisan.gov.in) वर जावे लागणार असून यानंतर तुमच्यासमोर पीएम किसान योजनेचे ऑनलाइन पोर्टल ओपन होईल आणि येथे तुम्हाला Know Your Status हा पर्याय दिसेल. यानंतर, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आणि ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर, तुम्हाला लाभार्थीची स्थिती दिसू शकते. मात्र, तुम्ही या योजनेसाठी केवायसी पूर्ण केले नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाहीत.