Crop Damage | शेतकऱ्यांनो थंडीमुळे पिके खराब होताय तर सरकार देणार भरपाई


Crop Damage | सध्या थंडीची लाट सगळ्या देशभर पसरली असून या वाढत्या थंडीमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. संपुर्ण भारतात या वाढत्या थंडीमुळे उत्तर प्रदेशात शेतकऱ्यांसाठी दाट धुके ही नवी समस्या बनली असून काही ठिकाणी पीक निकामी होण्याचा धोका वाढला आहे. तसेच वाढत्या हिवाळ्याच्या दिवसात सकाळी अनेकदा दव गोठलेले दिसत आहे.

देशासह महाराष्ट्रातील अनेक भागात तापमानात घसरण होत असून वाढत्या थंडीमुळे पिकांवर दव आल्याचं दिसुन येत आहे. यातच हे दव शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान करत आहे. दरम्यान, मेरठचे कृषी उपसंचालकांनी शेतकऱ्यांना आवाहन केले असून, पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत थंडीमुळे नुकसान होऊ शकणाऱ्या पिकांचा विमा काढणे आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे, कोणत्याही हंगामात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले तर अशा स्थितीत सर्व शेतकऱ्यांना सरकार नियमांनुसार नुकसान भरपाई देणार आहे.

Crop Damage | नैैसर्गिक आपत्तींमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक सहाय्य

सरकारने ठरवून दिलेल्या नियमांनुसार काही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट झाली तर अशा स्थितीत शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसान भरपाई देण्यात येत आहे. या नैसर्गिक आपत्तीत दुष्काळ, गारपीट आणि इतर कारणांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे नैैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून आर्थिक सहाय्य देण्यात येते.

यातच आता वाढत असलेल्या थंडीने पिकांना हानी पोहोचण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत त्यांच्या पिकांची नोंदणी करणे आवश्यक आहे आणि ही पिक विमा नोंदणी शेतकरी जवळच्या लोकसेवा केंद्र किंवा बँकेच्या माध्यमातून करू शकतात. पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे देशातील शेतकऱ्यांना सरकारकडून मदत देण्यात येणार आहे.

Crop Damage | अधिक माहितीसाठी शेतकरी टोल फ्री क्रमांक

मेरठचे कृषी उपसंचालक नीलेश चौरसिया म्हणाले की, शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान कमी झाल्यास एकूण खर्चाच्या अंदाजानुसार किती पीक नष्ट होऊ शकते त्यानुसार रक्कम उपलब्ध करून देण्यात येत आहे. दरम्यान, अधिक माहितीसाठी शेतकरी टोल फ्री क्रमांक 1800120909090 वर संपर्क साधू शकतात.