Farmer Scheme | मराठा आंदोलनामुळे शेतकऱ्यांचे अनुदान लांबणीवर..?


Farmer Scheme | मराठा आंदोलन पेटल्यामुळे शेतकऱ्यांचे अनुदान लांबणीवर पडणार..?

Farmer Scheme | नियमित कर्जफेड करणारे शेतकरी अनुदान योजनेपासून वंचित आहेत. शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केले होते. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेद्वारे अनुदान दिले जाणार होते. मात्र, एक वर्ष उलटून देखील शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नसून, लाखो शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे शेतकरी अनुदानासाठी आंदोलन करीत आहेत.

Farmer Scheme | कोल्हापुरातील शेतकरी अनुदान योजनेपासून वंचित..

त्याचबरोबर पात्र शेतकऱ्यांना दोन टप्प्यात अनुदान मिळाले असून, तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही. तर कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून विविध शेतकरी संघटनांनी आंदोलने केली आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्वात जास्त कर्ज भरणार जिल्हा म्हणून कोल्हापूरचेच नाव आहे. शेतकऱ्यांनी तिन्ही वर्षी नियमीत कर्जाची परतफेड केली. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही. (Farmer Scheme)

Farmers Scheme | ‘या’ योजनेसाठी सरकारने केली जोरदार तयारी!

बँकेचे अध्यक्ष आणि कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी २६ जानेवारी पूर्वी सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या सोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते. हि बैठक २२ जानेवारी रोजी घेण्याचे योजिले होते. मात्र, त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्याने या योजनेची बैठक होऊ शकली नाही. तर सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासोबत होणारी योजनेची बैठक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबणीवर आहे. काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात आंदोलन अंकुशच्या वतीने जिल्हा बँकेसमोर आंदोलन केले होते.

काय आहे, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना..?

राज्य सरकारकडून १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ पर्यंतच्या कालावधीत नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनाने अंतर्गत सरकारने प्रोत्साहन अनुदान देण्याचे १४ जुलै २०२२ रोजी जाहीर केले होते. राज्यातील पारंपारिक शेती करणार्‍या शेतकऱ्यांना होणार आहे. या महाराष्ट्राच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफीसह राज्यातील अल्पभूधारक आणि इतर शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

Farmers News | देशातील ‘या’ शेतकऱ्यांवर सरकार लावणार कर?

पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि दुष्काळग्रस्तमुळे आणि सरकारच्या अटींमुळे अनुदान मिळाले नाही. त्यासाठी सरकारने अनेक बदल केले. त्यात बँक, पतसंस्था, सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आणि ते नियमित भरले आहे. अश्या शेतकऱ्यांना लाभ मिळणे गरजेचे होते. मात्र, असे करून देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५० हजारांचे अनुदान जमा झालेले नाही. (Farmer Scheme)