Garlic News | ‘या’ पीकाची लागवड करून शेतकरी झाले करोडपती; शेतात लावले सीसीटीव्ही


Garlic News |  कांदा निर्यात बंदीमुळे सध्या कांद्याचे दरांमध्ये घसरण झाली आहे. तर, इतर पीकांचेही दर काही फार चांगले नाही. एकीकडे कांदा, फळ पीक, भाजीपाला, यांच्या भावांमध्ये घसरण होत असल्याचे चित्र असताना दुसरीकडे लासणाचे दर मात्र गगनाला भिडलेले आहे. लासणाच्या मागणीत वाढ झाल्याने दर लासणाने शेतकऱ्यांना करोडपती केले आहे.

सध्या देशभरात लसणाच्या भावात आणि मागणीत मोठी वाढ झाली असून, देशाची राजधानी दिल्लीत आणि इतर प्रमुख शहरांमध्ये लसणाचे दर हे ४०० रुपये प्रति किलोच्या पुढे गेले आहे. दरम्यान, याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर होत असून, लसूण उत्पादक शेतकऱ्यांना मात्र याचा मोठा फायदा होत आहे. यातच एका लसून उत्पादक शेतकऱ्याने चक्क लासणाच्या शेतात सीसीटीव्ही बसवले आहेत. हा शेतकरी मध्य प्रदेशातील अनेक शेतकरी लसूण विकून श्रीमंत झाले आहेत. यातील एका तरुण शेतकऱ्याने लसूण विकून १ कोटी रुपये कमावले आहेत.(Garlic News)

Garlic Price | कांद्यापाठोपाठ लसूण महागला; तब्बल 400 रुपये किलो भाव

Garlic News | एक कोटी रुपयांचा लसूण विकला

एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील राहुल देशमुख हा तरुण शेतकरी लसूण विकून करोडपती झाला आहे. याने तब्बल १३ एकर क्षेत्रावर लसणाची लागवड केली होती. तसेच यासाठी जवळपास एकूण २५ लाख रुपयांचा खर्च आला होता. पण, लसूण विकून त्यांनी खर्चापेक्षा ५ पट जास्त नफा मिळवला आहे. तर, आतापर्यंत एकूण एक कोटी रुपयांचा लसूण विकल्याची माहिती या शेतकऱ्याने दिली आहे. विशेष म्हणजे अजूनही राहुल यांच्या शेतात लसूण हेच पीक आहे. 

लसणाची चोरी होऊ नये म्हणून शेतात सीसीटीव्ही

अधिक माहितीनुसार, या शेतकऱ्याने आपल्या शेतात सौरऊर्जेचा वापर केला असून, त्याने आपल्या शेतातील पिकांच्या सुरक्षेसाठी पोर्टेबल सीसीटीव्ही कॅमेरेदेखील बसवले आहेत. एकूण चार एकरात लागवड केलेल्या या लसूण पिकावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी शेतात हे कॅमेरे बसवले आहे. दुसरे एक लखपती शेतकरी पवन चौधरी यांनी सांगितले की, “त्यांनी ४ एकर क्षेत्रावर लसूण पिकाची लागवड केली होती. ४ लाख रुपये खर्च केले असून, ६ लाखांचा नफा मिळावला. तसेच शेतातून लसूण चोरीला जात असल्यामुळे मला हे कॅमेरे लावावे लागल्याची माहिती या शेतकऱ्यांनी दिली आहे. 

Nashik | जिल्ह्यात कांदा लिलाव सुरु; बाजारसमितींची परिस्थिती काय?

लसणाच्या भावात अभूतपूर्व दरवाढ

लसणाचे दर हे वर्षाला साधारणपणे ८० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचतो. मात्र, या हंगामात त्याच्या भावात लक्षणीय वाढ झाली असून, लसणाचे दरांनी प्रतिकिलो ३०० रुपयांच्या पातळी ओलांडली आहे. त्यामुळे लअसून उत्पादक शेतकऱ्यांना याचा भरघोस नफा झाला असून, लसणाच्या भाव इतके वाढल्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. याआधी लसणाच्या भावात इतकी अभूतपूर्व दरवाढ कधीच झाली नव्हती. मात्र, यामुळे सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. (Garlic News)