Farmers Protest | शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानेच राजधानी बिथरली


Farmers Protest | मोदी सरकारच्या विरोधात देशातील शेतकरी हे पुन्हा किसान आंदोलन 2.0 साठी दिल्लीच्या दिशेने रवाना झाले आहेत. यात प्रमुख्याने पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. तर, शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला ‘चलो दिल्ली मार्च’ असे नाव देण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांची दिल्लीकडे येण्याची तयारी सुरू असल्याचे लक्षात घेऊन पोलिस व प्रशासनाकडून कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.  

या राज्यांच्या सीमांवर सुरक्षा वाढवली

शेतकऱ्यांच्या ‘चलो दिल्ली मार्च’ या आंदोलना पूर्वी दिल्लीला लागून असलेल्या राज्यांच्या हरियाणा, पंजाब व उत्तर प्रदेशच्या सीमांवर सतर्कता वाढवण्यात आली असून, या रस्त्यांवर काटेरी तारा तसेच सिमेंटच्या बॅरिकेड्सने सीमा झाकण्यात येत आहेत. अधिक माहितीनुसार, या आंदोलनात ‘संयुक्त किसान मोर्चा’ सहभागी नसेल. तर, अन्य काही शेतकरी संघटनांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. पण तरीही या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात सतर्कता वाढवण्यात आली आहे. (Farmers Protest)

Farmers News | शेतकऱ्यांना मोफत वीज तर, मजुरांना वर्षाला इतकी रक्कम

Farmers Protest | कलम १४४ लागू

देशातील शेतकऱ्यांच्या दिल्लीतील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ईशान्य दिल्लीमध्ये कलम १४४ लागू करण्यात आला आहे. यानुसार दिल्लीच्या सीमेवरच शेतकऱ्यांना रोखण्यासाठीची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. उत्तराखंड व मध्य प्रदेशमधील शेतकरीही दिल्लीला पोहोचणार असल्याचे असे सांगण्यात येत असून, शेतकऱ्यांच्या या आंदोलनाबाबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितले आहे की, त्यांनी केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यास तसेच याबाबत तातडीने बैठक घेण्यास सांगितले आहे.

सीमांवर काटेरी तारा,

देशातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानुसार ते दिल्लीमध्ये येऊन केंद्र सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. यापासून रोखण्यासाठी हरियाणा व पंजाबच्या सिंधू सीमेवर यंत्रणांनी काटेरी तारा, तसेच रस्त्यांवर सिमेंटचे बॅरिकेड्सही लावले आहेत. दिल्लीमधील गाझीपूर टिकरी व सिंधू बॉर्डरवरही दिल्ली पोलिस यासाठी तयारी करत आहेत. जेणेकरून आंदोलकांना दिल्लीत येण्यापासून रोखता येईल. गाझीपूर येथील सीमेवर पोलिसांनी वाहने व बॅरिकेड्स उभारले असून, सीसीटीव्ही व लाऊडस्पीकरही लावण्यात येत आहेत. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या आंदोलनात उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातील इतर संघटनाही सामील होऊ शकतात, त्याची भीतीही प्रशासनाला आहे. मात्र, असे झाल्यास दिल्ली-मेरठ महामार्गही विस्कळीत होईल.

Farmers News | देशातील ‘या’ शेतकऱ्यांवर सरकार लावणार कर?

इंटरनेट बंद

‘चलो दिल्ली मार्च’ या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने दिल्लीला लागून असलेल्या अनेक जिल्ह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असून, हरियाणा सरकारकडून ‘अंबाला-पटियाला’ ही सीमाही बंद करण्यात आलेली आहे. तसेच अंबाला, कुरुक्षेत्र, कठियाल, जिंद, हिसार, फतेहबाद व सिरसा अशा या सात जिल्ह्यांतही इंटरनेट सेवा खंडित करण्यात आलेली असून, हे सातही जिल्हे या शेतकरी आंदोलनाचे प्रमुख केंद्र समजले जातात. त्यामुळे येथील सरकारने या भागांमधील इंटरनेट सेवा खंडीत केलेली आहे.(Farmers Protest)