Dindori Lok Sabha | कांदा उत्पादकांना भारती पवारांची गॅरंटी; ‘मी निवडणून आल्यास हक्काने…’


Dindori Lok Sabha |  उद्या उत्तर महाराष्ट्रात अखेरच्या टप्प्याचे मतदान होणार आहे. यात नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघाकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे. गेल्या महिन्याभरापासून नाशिक आणि दिंडोरीत महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) जोरदार प्रचार सुरू होता. अखेर काल प्रचाराची सांगता झाली. प्रचारासाठी दोन्ही गटांनी आपल्या दिग्गज नेत्यांना मैदानात उतरवले होते.(Dindori Lok Sabha)

पंतप्रधान नरेंद्र मोदी. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अमोल कोल्हे यांसारख्या दिग्गज नेतेमंडळींनी आपली ताकद पणाला लावली. कांदा प्रश्नामुळे दिंडोरी मतदार संघ चर्चेत असून, याच कांदा प्रश्नावरून भारती पवारांनी आता एक वक्तव्य केले आहे. दरम्यान, डॉ. भारती पवार यांनी दिंडोरीतील मतदारांना मोठी गॅरंटी दिली आहे. कांद्यावरील निर्यातबंदीमुळे शेतकरी वर्ग संतापला असून, यावरून विरोधकांनी या मतदार संघात सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली होती.  

Onion Export Ban | निर्यात बंदी हटवल्याने विरोधक नाराज; काय म्हणाल्या भारती पवार..?

Dindori Lok Sabha | प्रश्नी पंतप्रधान काय म्हणाले? 

“आम्ही कांदा स्टॉक करण्याचे काम हाती घटले आहे. जवळपास ६० हजार मेट्रिक टन इतका कांदा आम्ही खरेदी केला असून, आता आणखी ५ लाख मेट्रिक टन इतका कांदा आम्ही पुन्हा स्टॉक करणार आहोत. तर, आमच्या काळात ३५ टक्के इतकी कांदा निर्यात वाढली आहे. तसेच निर्यातीसाठी आम्ही अनुदानही दिले आहे, असे पिंपळगाव बसवंत येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करताना म्हणाले. 

Onion Export | निर्यातबंदी असूनही ‘या’ देशात ९० टक्के भारतीय कांद्याची विक्री

मी निवडून आल्यास कांदा प्रश्न हक्काने सोडवून घेईल 

यामुळे दिंडोरी लोकसभेची निवडणूक कांदा प्रश्न हा दिंडोरीच्या निवडणुकीचा महत्त्वाचा विषय असून, यामुळे ही लढत आता अटीतटीच्या वळणावर येऊन पोहचली आहे. उद्या दिंडोरीत मतदान होणार असून, या पार्श्वभूमीवर डॉ. भारती पवार यांनी कांदा उत्पादकांना आश्वासन दिले असून, “मी निवडून आले तर, शेतकऱ्यांचा कांदा प्रश्न मी हक्काने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सोडवून घेणार असल्याचे मध्यमांशी संवाद साधताना भारती पवार म्हणाल्या. तसेच देशाच्या हितासाठी जास्तीत जास्त मतदारांनी उद्या मतदान करण्याचे आवाहनही पवार यांनी यावेळी केले. (Dindori Lok Sabha)