Devendra Fadnavis | नाशिकमधून फडणवीसांची कांदा उत्पादकांसाठी मोठी घोषणा


 नाशिक : दिंडोरी मतदार संघ हा कांदा प्रश्नामुळे चांगलाच चर्चेत आला असून, आपला बालेकीला अबाधित ठेवण्यासाठी भाजपने आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तर, आज देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भारती पवारांच्या (Dr Bharti Pawar) प्रचारार्थ मनमाड येथे सभा झाली. यावेळी तुफान फटकेबाजी फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.  

 “भारती पवारांना मोठ्या मताधिक्याने निवडणून द्या. नांदगाव मतदारसंघातील तुमचे जे काही प्रश्न आहेत. ते सर्व मार्गी लावण्याचे काम मी स्वतः करेल. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पूर्वेकडे आणायचे आहे. त्यासाठी ६० ते ७० हजार कोटींचे नियोजन येणाऱ्या काळात करण्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.  

Nashik Onion | खाजगी जागांवर लिलाव सुरू केल्याने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांचे धाबे दणाणले

कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढणार

मोदीजींनी गेल्या १० वर्षात देशभरात अनेक योजना राबविलेल्या आहेत. गरीब नागरिकांना मोफत रेशन मोदींच्या माध्यमांतून मिळत असून, मुद्रा लोन देखील देण्यात येत आहे. देशातील तब्बल दहा कोटी महिलांना मोदींनी रोजगार मिळवून दिला असून, अनेक योजना देखील आणल्या आहेत. लवकरच प्रत्येकाच्या घरावर सोलर देखील लागणार आहेत.

३०० युनिट वीज मोफत तयार होणार आहे. शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी आणि शेतमाल उद्योग प्रक्रिया दिली असून, लवकरच आम्ही कांदा प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठीदेखील धोरण राबवणार आहे. तसेच मनमाड शहरासाठी बायपास मंजुरीसाठीही प्रस्ताव देण्याची मागणी आमदार सुहास कांदेंनी यावेळी केली आणि त्यांना मी आश्वासन देतो की, लगेचच येथे बायपास मोदीजींकडून आपण मंजूर करून घेऊ. 

Nashik News | पाच तालुक्यांत ‘कृषी भवन’; मंत्री भूसेंच्या पाठपुराव्याने शेतकऱ्यांना दिलासा

मोदीजी बाप बनून बसलेत 

पूर्वी आपल्या देशात बॉम्बस्फोट व्हायचे. तेव्हा आपल्या देशाचे पूर्वीचे पंतप्रधान हे मूग गिळून गप्प बसायचे आणि लाचारी बाळगून अमेरिकेमध्ये जायचे. मात्र, मोदीजींनी सर्जिकल स्ट्राईक केले. त्यानंतर आजतागायत देशात कुठलेही बॉम्बस्फोट झाले नाही. कारण मोदीजी सर्वांचे बाप बनून बसलेले आहे. आज पाकिस्तान हा आपल्या देशाला घाबरतोय. देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला भाजपला परिणामी भारताला मतदान करायचे आहे हे आपण लक्षात ठेवा, असे आवाहन यावेळी फडणवीस यांनी केले.