Weather Update | सध्या संपुर्ण भारतात थंडीची लाट पसरली असून सध्या देशासह राज्यातील शेतकरी घसरत्या तापमानामुळे चिंतेत आहे. यातच, पुढील ५ दिवस उत्तर भारतात धुके आणि थंडीचा तीव्रता कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच दक्षिण आसामवर चक्रीवादळाची तीव्रता ही सरासरी पातळीपेक्षा 1.5 किमी पर्यंत पोहोचली असून त्याचा परिणाम संपुर्ण देशातील हवामानावर दिसून येईल.
Weather Update | या कारणामुळे अनेक भागात पाऊस…
दरम्यान, वाढत्या थंडीने शेतकऱ्यांना चिंतेत टाकलं असून सामान्य नागरिकांना देखील याचा मोठ्या प्रमाणात फटका बसताना दिसत आहे. उत्तर प्रदेशमधील काही जिल्ह्यातील शाळांना २२ तारखेपर्यंत सूटी जारी करण्यात आली आहे. या घसरत्या तापमानामागील कारण म्हणजे, दक्षिण-पूर्व अरबी समुद्र आणि लगतच्या विषुववृत्तीय हिंदी महासागरावर एक चक्राकार परिवलन तयार झाले असून त्यामुळे पुढील २४ तासांत ओडिशा, छत्तीसगडचा काही भाग आणि तामिळनाडूच्या दक्षिण किनारपट्टीवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
पूर्व भारतातील अनेक भागात येत्या 3 दिवसात किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घसरण होण्याची शक्यता असून पंजाब आणि हरियाणाच्या विविध भागात पुढील ५ दिवस तीव्र थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील 24 तासांत, पश्चिम बंगाल, ओडिशामधील काही भाग, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू आणि लक्षद्वीप या भागात हलका पाऊस पडलेला आहे.
Weather Update | काही भागात हलका पाऊस
तसेच, झारखंड, बिहार, छत्तीसगड, दक्षिण-पूर्व मध्य प्रदेशमधील काही भागात हलका पाऊस पडला असून पश्चिम हिमालयाच्या वरील भागात तुरळक हलका पाऊस पडला आहे. यातच सध्या पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधील काही भागात थंडीची लाट पसरली असून पंजाब आणि राजस्थान या राज्यांच्या अनेक भागात दाट धुके राहण्याची शक्यता आहे.