Onion Export | नशिक जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या कांद्यावर केंद्र सरकारने निर्यात बंदी लादल्यामुळे नशिक जिल्ह्यातील कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी नाराज आहेत. दरम्यान, कांदा निर्यात बंदिवर नशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी भाष्य केले आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, कृषी विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या आणि नाशिक कृषी व नवतेजस्विनी महामहोत्सवाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन हे मंत्री दादा भुसे यांनी केले. यावेळी ते बोलत होते. (Onion Export)
Onion Export | काय म्हणाले पालकमंत्री दादा भुसे..?
ते म्हणाले की,”कांदा आणि द्राक्ष उत्पादकांच्या निर्यातविषयक अडचणी या मोठ्या आहेत आणि याची आम्हाला पूर्णपणे कल्पना आहे. केंद्र पातळीपर्यंत या समस्या सोडवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न राज्य सरकार करत आहे. यातून कांदा आणि द्राक्षांच्या निर्यातीच्या प्रश्नावर काही सकारात्मक तोडगा हाती येईल, असा विश्वास यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला आहे. तर, (दि. १४) फेब्रुवारीपर्यंत हे कृषी प्रदर्शन नगरिकांसाठी खुले असणार आहे. डोंगरे वसतिगृह मैदान येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. ‘आदर्श शेतकरी पुरस्कार- २०२४’ यामुळे जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनाही प्रेरणा मिळेल, असा विश्वासही यावेळी भुसे यांनी व्यक्त केला.
Onion Export Ban | भारतातील कांदा निर्यात बंदीमुळे पाकिस्तानी शेतकरी मालामाल
सरकारच्या शेतकऱ्यांसाठी या योजना
तसेच, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘प्रधानमंत्री सन्मान निधी योजना’ ही केंद्र सरकारतर्फे सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार केंद्र शासनाद्वारे सहा हजार आणि महाराष्ट्र शासनाद्वारे ‘नमो शेतकरी सन्मान योजना’ राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत. तसेच या सन्मान निधीसह फक्त एक रुपयात पीक विमा देणारे देशातील ‘महाराष्ट्र’ हे एकमेव राज्य असल्याचे यावेळी दादा भुसे यांनी सांगितले.(Onion Export)
यावर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्याने जिल्ह्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पेयजलाचे आणि शेतीसाठी पाण्याच्या नियोजनाची कार्यवाही ही जिल्हा पातळीवर सुरू असून, प्रत्येक भागात मुबलक प्रमाणात पाणी मिळावे यासाठी सूक्ष्म नियोजन केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. दरम्यान, यावेळी प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, महिला आणि बाल विकास विभागाचे उपायुक्त चंद्रशेखर पगारे, कृषी विकास अधिकारी कैलास शिरसाठ, जिल्हा समन्वय अधिकारी संजय गायकवाड इत्यादि अधिकारी तथा मान्यवर याठिकाणी उपस्थित होते.
Onion Export Ban | कांदा निर्यातबंदीचा फटका द्राक्ष उत्पादकांनाही
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री भुसे हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी या कृषी महोत्सवाचे उद्घाटन केले आणि प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी मातीपूजनही करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र निकम यांनी केले. तर, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते नामांकित प्रगतशील शेतकऱ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांनी मनोगत व्यक्त केले आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले.