Water Shortage | पाणीपुरवठा न झाल्याने देवळ्यात महिलांनी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे


सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | चणकापुर उजव्या कालव्याच्या आवर्तनाने रामेश्वर धरण ३० टक्के भरले असून गुंजाळनगर ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे गुंजाळनगर गावात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. यामुळे येथील महिलांनी गुरुवार (दि.२३) रोजी पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढत येथील महिलांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. (Deola)

Water Shortage | स्वखर्चाने पाणी विकत घ्यावे लागत आहे

येथील गुंजाळनगर गावाला रामेश्वर धरणावरून पाणीपुरवठा होतो. परंतू गेल्या तीन महिन्यापासून रामेश्वर धरण कोरडेठाक पडल्याने येथील पाणीपुरवठा ठप्प आहे. धरणात पाणी नसल्याने येथील पाणीपुरवठा योजना बंद होती. त्यामुळे येथील नागरिकांना गेल्या तीन महिन्यांपासून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गुंजाळनगर गावाला पिण्यासाठी दिवसाला दोन टँकरने पाणी पुरवठा होतो. तर, पंधरा ते वीस दिवसांत अत्यल्प पाणी पुरवठा होतो. मात्र, तो पुरेसा नसल्यामुळे नागरिकांना स्वखर्चाने टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. (Water Shortage)

Water Shortage | देवळ्यातील दुष्काळाची दखल घेत अकरा दिवस आधीच पाणी सोडले

पाणी येत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत उघडू देणार नाही

पाण्याचा हा यक्षप्रश्न निर्माण झाल्यामुळे येथील संतप्त महिलांनी गुरुवार (ता. २३) रोजी गुंजाळनगर ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढत जोपर्यंत पिण्याचे पाणी येत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. या भागातील पाणीपुरवठा योजना या रामेश्वर धरणावरून अवकमबुण असून, या धरणात ३० एप्रिल रोजी चणकापुर उजव्या कालव्यातून रामेश्वरसाठी पिण्याचे आवर्तन सोडण्यात आले होते. ते आवर्तन २० मे रोजी बंद करण्यात आले असून सद्यस्थितीत रामेश्वर धरणात (Rameshwar Dam) ३० टक्के पाणीसाठा असूनही गावासाठी पाणी पुरवठा होत नसल्याने येथील महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला आणि जोपर्यंत पिण्याचे पाणी येत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत उघडू देणार नसल्याचा इशारा देत ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे टोकले आहे. (Water Shortage)

Water Shortage | देवळा तालुक्यात २५ गावे, ३२ वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा

ग्रामपंचायत प्रशासनाला कुठलीही पूर्वसूचना न देता ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप लावणे चुकीचे आहे. चनकापूर उजव्या कालव्याद्वारे रामेश्वर धरणात पाणी आल्याने गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीला पाणी आले असून, उद्यापासून सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल. – विनोद आहेर, उपसरपंच, गुंजाळनगर ग्रामपंचायत