Igatpuri | इगतपुरीत यंदा ३१ हजार हेक्टरवर होणार भात लागवड; मशागतीला वेग


राम शिंदे – प्रतिनिधी : सर्वतीर्थ टाकेद | हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार यंदा पावसाळा लवकर दाखल होणार आहे. त्यामुळे अता सगळीकडे शेतकरी खरीप हंगामातील पेरणीसाठी मशागती करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील तांदळाचे कोठार असलेल्या इगतपुरी तालुक्यात (Igatpuri) भात लागवड करण्यात येणाऱ्या खाचरांची नांगरणी, वखरणी, तण काढणे, वैरण साठवणूक अशी विविध कामे सध्या सुरू आहेत. यामुळे खरीपाच्या तयारीला वेग आला आहे. शेतकऱ्यांसह कृषी विभागही सज्ज झाला आहे. तालुक्याचे जून ते ऑक्टोबर पर्यंतचे सरासरी पर्जन्यमान ३४४२ मिलिमीटर आहे.

भात लागवडीत अग्रेसर असणाऱ्या इगतपुरीत (Igatpuri) यंदा खरिपाचे ३३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट आहे. ३१ हजार हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येणार आहे. १२६ महसूली गावे व वाड्यांमधील शेतकरी भात, वरई, नागली, सोयाबीन, खुरासणी, मका आदी पिके घेतात. यासोबतच अनेक शेतकरी टोमॅटो, भाजीपाला सारखे बागायती पिकेही घेतात. शेतकरी इंद्रायणी, फुले समृद्धी, एक हजार आठ, सोनम, गरी, हाळी, कोळपी या जातीचे भात पीक घेण्यास प्राधान्य देतात.

Igatpuri | वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; वीज पडून दोन जनावरांचा मृत्यु

खरिपाचे उद्दिष्ट्य ३३ हजार ६०० हेक्टर

तालुक्याचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ३१ हजार २२६ हेक्टर असून, यंदाच्या खरिपाचे उद्दिष्ट्य ३३ हजार ६०० हेक्टर असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी रामदास मडके यांनी दिली. मागील वर्षी ३३ हजार ३०० हेक्टर होते. तालुक्यात मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते. यामध्ये प्रामुख्याने इंद्रायणी, गरी, कोळपी, १००८, वाय.एस.आर, हळे, पूनम, डी- १००, ओम ३, सेंच्युरी, ओम श्रीराम १२५, रूपाली, रूपम, विजय, आवाणी, लक्ष्मी, खुशबू, सोनम, दप्तरी १००८, वर्षा, राजेंद्र, बासमती आदी प्रमुख जाती घेतल्या जातात.

Water Scarity | धरण उशाला अन् कोरड घशाला; घोटभर पाण्यासाठी महिलांची पायपीट

Igatpuri | बळीराजा मशागतीत व्यस्त

तालुक्याचे सरासरी क्षेत्र ३१ हजार २२६ हेक्टरवर असून यात वाढ होत ३३ हजार ६०० हेक्टरवर खरीप पेरणीचे उद्दिष्ट्ये आहे. सध्या तालुक्यात शेतकरी फनणी, नांगरणी, शेणखत पसरविणे, तण गोळा करणे, पालापाचोळा गोळा करणे अशा शेतीच्या मशागती करण्यात शेतकरी व्यस्त असून बी – बियाणे, खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु आहे.

शेतकरी बांधवांनी भात पिकाचे चांगले उत्पादन होण्यासाठी चतुसूत्री पद्धतीचा वापर करावा त्यामध्ये चांगले संकरित वाणाची बियाणे निवडावे. भात खाचरात चिखलनी करताना गिरीश पुष्पचा वापर करावा. नियंत्रित पद्धतीने लागवड 15×25 सेंटीमीटर वर करावी व युरिया ब्रिकेट्सचा वापर करावा. – रामदास मडके, तालुका कृषी अधिकारी, इगतपुरी