Water Shortage | देवळ्यातील दुष्काळाची दखल घेत अकरा दिवस आधीच पाणी सोडले


सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा | चणकापूर धरणातून उजव्या कालव्याद्वारे देवळा तालुक्यातील रामेश्वर लघु पाट बंधाऱ्यात मंगळवार (दि. 30) रोजी पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडण्यात आल्याने तालुक्यातील पाच गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार असल्याने दुष्काळाने होरपळलेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. याबाबत वर्तमानपत्रातून गेल्या महिन्याभरापासून देवळा तालुक्यातील दुष्काळाची वस्तुनिष्ठ दाहकता मांडल्याने ११ मे रोजी सोडण्यात येणारे पाणी अकरा दिवस अगोदरच सोडण्यात आले. (Water Shortage)

Water Shortage | देवळा तालुक्यात २५ गावे, ३२ वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा

जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी त्याची दखल घेऊन देवळा तालुक्यातील रामेश्वर लघु पाटबंधारे १६६ द.ल.घ.फू पाणी पिण्यासाठी सोडण्याचे आदेश गिरणा नदी खोऱ्याचे कार्यकारी अभियंता यांना दिले. त्याचबरोबर कळवण तालुक्यातील मानूर, भेंडी व निवाने या गावांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी ६५ द.ल.घ.फू पाणी देण्याचे आदेशात म्हटले आहे. त्याचबरोबर पाणी सुरू असताना आवर्तन कालावधीत अनधिकृत उपसा करणाऱ्या विद्युत पंपांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याबाबत वीज मंडळाच्या कार्यकारी अभियंताना सूचना देण्यात आल्या आहेत.

Water Shortage | नाशिकमध्ये पाणीबाणी; बघा कोठे किती पाणीसाठा..?

आवर्तन कालावधीत अनधिकृत पाण्याचा उपसा होणार नाही. याकरिता सर्व पाणी वापर संस्था यांनी संयुक्त पथक तयार करून प्रतिबंधात्मक कार्यवाही करणे कामी आपल्या स्तरावरून पथक तयार करावे. तसेच पाण्याची चोरी करणाऱ्यांच्या विरोधात पाटबंधारे विभागाने कळविल्यास पोलीस बंदोबस्त पुरविण्याबाबत पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांना देखील कळविण्यात आले आहे. सदर आवर्तनातील पिण्याचे पाणी हे शेवटच्या गावापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी ही पाटबंधारे विभागाची राहील, असे जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशात म्हटले असून सदरचे पाणी हे 30 एप्रिल पासून ते 20 मे पर्यंत अकस्मिक आरक्षणाचे पिण्याचे आवर्तन म्हणून सोडण्यात येत आहे. (Water Shortage)