Water Shortage | थंडीचा ओघ कमी होऊन आता उन्हाळ्याला सुरुवात होत आहे. मात्र, आतापासूनच राज्यात बहुतांश भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी राज्यात पावसाने सुरुवातीला हुलकावणी दिली. त्यामुळे आतापासूनच जिल्ह्यासह राज्यभरातील अनेक भागांतील विहिरी आणि नद्यांची पाणी पातळी खालावली आहे. धरणांचाही पाणीसाठा आता कमी होत असून आताच ही परिस्थिती असल्यास ऐन उन्हाळयात पाण्यासाठी वणवण फिरावे लागते की काय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यात पाण्याची स्थिती ही अत्यंत चिंताजनक असून, अहवालानुसार नाशिक जिल्ह्यातील धरणक्षेत्रांमध्ये केवळ ५२ टक्के इतकाच पाणीसाठा आहे. आताच ही परिस्थिती असल्यास येणाऱ्या काळात हे चित्र आणखी विद्रूप होण्याची शक्यता आहे.
Water Shortage | ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी वणवण; ‘या’ गावात उद्भवली भीषण स्थिती
नाशिककरांवर पाणीटंचाईची टांगती तलवार
यावर्षी फक्त नशिक जिल्ह्यातच नाहीतर, संपूर्ण राज्यातच पाऊस हा अत्यल्प प्रमाणात झाला. त्यामुळे ऐन पावसाळ्यातही काही गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे पीकांचे नुकसान झाले. मात्र, धरणांची पाणी पातळी वाढल्याने दिलासा मिळाला. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणात सध्या ६५ टक्के पाणीसाठा असून, गेल्यावर्षी या काळात हा साठा ७९ टक्क्यांवर होता. त्यामुळे नशिक शहराची जीवनवाहिनी असलेल्या या धरणाचा पणीसाठी खालवणे चिंताजनक बाब असून, यामुळे उन्हाळ्यात नाशिककरांवर पाणीटंचाईची टांगती तलवार असणार आहे.(Water Shortage)
Water Shortage | डिसेंबर महिन्यातच नाशिकच्या पाणीटंचाईची भीषणता अधिक तीव्र…
कोणत्या धरणात किती पाणी..?
नशिक जिल्ह्यातील धरणांचा विचार केला असता, कश्यपी धरणात ९३ टक्के, गौतमी-गोदावरी ६७ टक्के, आळंदी ६३ टक्के, पालखेड ३३ टक्के, करंजवण ४७ टक्के, ओझरखेड ४५ टक्के, दारणा ५१ टक्के, भावली ४५ टक्के, वालदेवी ८८ टक्के, नांदूरमध्यमेश्वर ६३ टक्के, चणकापूर ६५ टक्के, हरणबारी ६८ टक्के, गिरणा ४१ टक्के, माणिकपुंज २३ टक्के असा एकूण ५२ टक्के पाणीसाठा हा सध्या नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये आहे.
नाशिक विभागातील एकूण ५३८ धरणांत ५६.३७ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याकाळात हा साठा ८५.६८ टक्क्यांवर होता. तर, दारणा धरणसमुहात ५१.३६ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, किडवा धरणात ४१.४८ टक्के इतका साठा आहे. गंगापूर धरण ६६.०९ टक्क्यांवर आहे तर, मुकणे धरणात ५५.२० टक्के इतका पाणीसाठा आहे.(Water Shortage)