Water Shortage | ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी वणवण; ‘या’ गावात उद्भवली भीषण स्थिती


Water Shortage | यंदा राज्यासह नाशिक जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झाला नाही तसेच जिल्ह्यातील अनेक भागात ऐन पावसाळ्यात ‘ड्राय स्पेल’ गेल्याने नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात दुष्काळजन्य स्थिती उद्भवल्याचं चित्र आहे. यातच, नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहराला नियमित पाणीपुरवठा योजनेचे काम सध्या सुरु असून याच दरम्यान, नांदगाव शहरातील लेंडी नदीपात्रात नव्या पुलाचे काम सुरु असताना नांदगावाला पाणीपुरवठा करणारी चारशे एमएमची मुख्य जलवाहिनी फुटलेली. यामुळे गेल्या २० दिवसांपासून नांदगावसह शहरातील सतरा गावांचा पाणी पुरवठा ठप्प झाल्याचे चित्र आहे. 

नांदगावातील सतरा गावांचा तब्बल २० दिवस उलटून गेले असली तरी नांदगाव नगरपरिषदेमार्फत केला जाणारा पाणीपुरवठा सुरळीत केला नसल्याने नांदगाव येथील काही स्त्रीयांनी रस्त्यावर येत रास्ता-रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी हातात रिकामे हांडे घेवून नांदगाव येथील काही स्त्रीयांनी जोरदार घोषणाबाजी केली. नांदगाव शहरासह सतरा गावांत सलग वीस दिवस उलटूनदेखील पाणीपुरवाठा सुरू न झाल्याने ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी नांदगावमधील महिलांना वणवण करावे लागत आहे.

Water Shortage | नाशिक जिल्ह्याला दुष्काळाचे चटके

यंदा महाराष्ट्रात अत्यल्प पाऊस झाल्याने राज्यातील धरणांतील पाणीसाठा हा फक्च ६४ टक्केच उरलेला असून राज्यातील अनेक भागतील नागरिकांवर पाणीकपातीची टांगती तलवार असून नाशिक जिल्ह्यात तर डिसेंबर महिन्यातच अनेक भागात ट्रॅंकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ उद्भवली असून येत्या उन्हाळ्यात याची भिषणता आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातही यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने या विभागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून या पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील खरीप हंगामातील 2023-24 ची सुधारित आणेवारी घोषीत करण्यात आली असताना ज्यात मराठवाड्याच्या विभागातील आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी 50 पैश्यांच्या आत असल्याचे समोर आलेलं आहे.

Water Shortage | शेती पिकांवर होतोय परिणाम

नाशिक जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील शेती पिंकावर परिणाम होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. येत्या उन्हाळ्यातील भेडसावणाऱ्या दुष्काळाची चाहूल २०२३ मधील डिसेंबर महिन्यातच लागली असून जिल्ह्यातील शेतकरी सध्या चितेंत आहेत. आता येत्या उन्हाळ्यात जिल्ह्यातील शेती उत्पादनांची काय स्थिती असणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.