Water Shortage | डिसेंबर महिन्यातच नाशिकच्या पाणीटंचाईची भीषणता अधिक तीव्र…


Water Shortage | यंदा राज्यासह नाशिक जिल्ह्यात अपेक्षित असा पाऊस झाला नाही याचाच परिणाम आता डिसेंबर महिन्यातच राज्यातील काही भागांना पिण्याच्या पाण्यासाठीही टँकरवाऱ्या सुरू झाल्या आहेत. यातच मुख्य म्हणजे नाशिक विभागात पाणीटंचाईच्या झळा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून डिसेंबर महिन्यातच नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवाऱ्या सुरू असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे.

नाशिक जिल्ह्यातील काही भागात सध्या सरकरी यंत्रणेकडून 440 गावं आणि वाड्यांवरील 2 लाख 4 हजार 260 नागरिकांना 127 टँकरद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा केला जात असून यापैकी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 199 गावं तसेच वाड्यांना 35 टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवल्या जात आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाळ्यात पुर्ण एका महिन्याचा ‘ड्राय स्पेल’ झाला आणि त्यानंतरच्या काळातही अपेक्षित असा पाऊस झाला नसल्याने पाणीपातळी घटत 54 पैकी 10 तालुक्यांत डिसेंबर महिन्यातच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत आहे.

नाशिक जिल्ह्यात यंदा अत्यल्प पाऊस झाल्याने आता नाशिककरांवर पाणीटंचाईची भीषण स्थिती ओढावलेली असताना यात प्रमुख म्हणजे नाशिक जिल्ह्यातील बागलाण, चांदवड, नांदगाव, मालेगाव, देवळा, सिन्नर, येवला या विभांगाचा समावेश आहे. सध्या या विभागांमध्ये 16 शासकीय तसेच 111 खासगी टँकरद्वारे 154 गावे आणि 286 वाड्यांवर टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे.

Water Shortage | खासगी ट्रॅंकर लॉबीचा उत्तम पर्याय..

आताच उद्भवलेल्या पाणीटंचाईची येत्या उन्हाळ्यात आणखी वाढण्याची भिती आता वर्तवण्यात येत असून संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाकडून 48 विहिरींचे अधिग्रहण करण्यात आलेले आहे. नाशिक जिल्ह्यातील उद्भवलेल्या पाणीटंचाईमुळे खासगी टँकर लॉबीला मात्र चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे. यामुळे शासकीय यंत्रणेवर ताण न येता खासगी टँकर लॉबीमुळे नागरिकांना एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे.