Agricultural Machinery | आता शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार अनुदानित कृषी यंत्रे


Agricultural Machinery | देशात शेतकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना करण्यात येतात आणि यातच पंजाब राज्यातील फतेहगड साहिब जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. आता शेतकऱ्यांना कृषी यंत्रे घेण्यासाठी बँकांमध्ये जाण्याची गरज नसून त्यांना अनुदानित कृषी यंत्रे घरपोच मिळणार आहे. पंजाब राज्यातील फतेहगड साहिब जिल्ह्यातील उपायुक्त प्रनीत शेरगिल यांच्या नेतृत्वाखाली कृषी यांत्रिकीकरण (सॅम) योजनेंतर्गत कृषी यंत्रांच्या खरेदीवर शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी शुक्रवारी ऑनलाइन सोडत काढण्यात आली.

या योजने अंतर्गत पंजाबमधील निवड झालेल्या शेतकऱ्यांना 31. 88 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याचे उपायुक्त प्रनीत शेरगिल यांनी सांगितले आहे. या ड्रॉद्वारे निवडलेल्या शेतकऱ्यांना नऊ न्यूमॅटिक प्लांटर्स, दोन डीएसआर, सात बटाटा प्लांटर्स, दोन सेमी-ऑटोमॅटिक बटाटा प्लांटर्स, पाच ऑटोमॅटिक बटाटा प्लांटर्स आणि पाच लेझर लँड लेबल दिले जाणार आहे. या कृषी यंत्रांचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे उपायुक्तांचे म्हणणे असून या तंंत्रज्ञानाच्या मदतीने ते सहजपणे पिकांची पेरणी करू शकतात.

Agricultural Machinery | कृषी यंत्रांच्या खरेदीवर देशातील सर्व राज्यांमध्ये शेतकऱ्यांना अनुदान

आधुनिकीकृत शेतीप्रणालीचे उपयोग शेतीमध्ये उच्च उत्पादन आणि उच्च वापर दोन्ही सुनिश्चित करत असते. नवीन तंत्रज्ञान आणि प्रौद्योगिकीचा उपयोग करून शेतीमध्ये श्रमपूर्ण काम कमी करण्याची क्षमता मिळते आणि परिणामी शेतीतील उत्पादनाची वाढ होते. हे शेतीकरी संकल्पना शेतीच्या उत्कृष्टतेला वाढवते आणि शेतकऱ्यांना आर्थिक विकासाची संधी देते.

पंजाबमधील ही योजना देशातील प्रत्येक राज्यात राबवली गेला पाहीजे जेणेकरूण देशातील शेतकऱ्यांना आधूनिक शेतीकडे वळविण्यास मदत होईल. दरम्यान, कृषी यंत्रांच्या खरेदीवर देशातील सर्व राज्यांमध्ये शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. उत्तर प्रदेश मध्येही शेतकऱ्यांना कृषी उपकरणांवर ४० टक्क्यांपर्यंत सबसिडी दिली जाते.