Viral News | महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते यातच सध्या देशासह राज्यातील कृषी क्षेत्रात आधूनिकीकरणावर भर दिला जात आहे. यातच, महाराष्ट्रातील बारामती एग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राने एक नवीन तंत्रज्ञान विकसित केले असून महाराष्ट्रातील बागायती शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
सध्या महाराष्ट्रात कृषी क्षेत्रात अनेक प्रयोग केले जात असून आता एकाच रोपातून बटाटे आणि टोमॅटोचे उत्पादन घेणं शक्य आहे. टोमॅटोची फळे झाडावर उगवले, तर त्याच्या मुळाच्या खालून बटाट्याचं पिक तयार होत असून हे नवीन तंत्रज्ञान महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार असल्याचं सध्या कृषीतज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे शास्त्रज्ञांकडून याला ‘पाल्मेटो’ असे नाव देण्यात आले असून टोमॅटोबरोबरच वांग्याच्या रोपातूनही भोपळा पिकवण्यात बारामतीत शास्त्रज्ञांना यश आलेले आहे.
Viral News | ‘पेन’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बटाट्याच्या झाडावर टोमॅटोची लागवड
महाराष्ट्रातील बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात शेतीसाठी वेगवेगळी तंत्रे वापरली जात असून बारामती कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांनी ‘पेन’ तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बटाट्याच्या झाडावर टोमॅटोची लागवड करून एक विशेष प्रयोग यशस्वी केला आहे. विशेष म्हणजे या यशासाठी AI तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आलेला आणि यात एका रोपावर अंदाजे अनेक किलो टोमॅटो वाढत असल्याचं कृषी शास्त्रज्ञांच्या निदर्शनास आले आहे.
Viral News | AI या तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार
बारामती जिल्ह्यात ज्याप्रकारे टोमॅटोची लागवड बटाट्याच्या झाडांवर करण्यात आली त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून वांग्याच्या पिकांवर टोमॅटोची लागवड करण्यात येत आहे. बारामतीत अशा अनेक पिकांमध्ये कलम पद्धत विकसित करण्यात आली असून या तंत्रज्ञानाने शेतकरी हंगाम नसतानाही त्या पिकांची लागवड करू शकतात. AI या तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याचे बारामती येथील शास्त्रज्ञांचे मत आहे. यामुळे दोन पिके घेण्यासाठी आता शेतकऱ्यांना वेगवेगळ्या जागेची गरज भासणार नाही.