Rice Rate Update | तांदळाचे भाव कडाडले; वाढत्या महागाईने सरकारची वाढली डोकेदुखी


Rice Rate Update | यंदा राज्यातील शेतकरी दुहेरी संकटात सापडले असून यंदा झालेल्या अत्यल्प पावसाने राज्याच्या अनेक भागांत दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच याचा परिणाम मोठ्या प्रमाणात राज्यातील शेतीवर होत असून सध्या अनेक शेतीपिकांचा भाव तेजीत जाताना दिसत आहे. यातच आता तांदळाच्या दरात सातत्यानं वाढ होत असून सध्या राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात तांदळाला प्रचंड मागणी आहे.

तांदळाच्या वाढत्या मागणीनुसार सध्या बाजारातील तांदळाची आवक ही कमी प्रमाणात होत असून यंदाच्या एकूण नैसर्गिक वातावरणाचा परिणाम सर्व उत्पदनांच्या किंमती वाढताना दिसत आहे. दरम्यान, यातच तांदळाच्या किंमतीने मागील 15 वर्षांतील उच्चांकी दर गाठला आहे. यावर्षी अल-निनोच्या प्रभावामुळे तांदळाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाला आता याचाच परिणाम म्हणुन तांदळाच्या दरात विक्रमी वाढ होताना दिसत आहे. तांदळाच्या महागाईने आधीच लोकांच्या अडचणी वाढवल्या असून येत्या काळात तांदूळ आणखी महाग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Rice Rate Update | तांदळाचे भाव वाढण्याचं मुख्य कारण काय?

भारत सरकारने कांद्यासह तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली असताना निर्यातबंदी आणि थायलंडमध्ये भात पिकाचं झालेलं नुकसान हे तांदळाच्या एकूण किंमती वाढण्याचे मुख्य कारण असल्याचं स्पष्ट होत आहे. दरम्यान, नोव्हेंबरपासून तांदळाच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ होत असून पुढे येणाऱ्या खरीप हंगामात भारतातील तांदूळ उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वाढत्या महागाईने सरकारची वाढली डोकेदुखी

भारत हा तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक देश असून भारतात तांदळाच्या किंमतीत झपाट्याने वाढ होत असताना सरकारच्या मात्र अडचणी वाढताना दिसत आहे. नुकतंच सरकारने तांदूळ कारखान्यांना तांदळाच्या किंमती कमी करण्याचे आदेश दिले असताना आगामी निवडणुकींच्या पार्श्वभुमीवर भारतातील वाढती महागाई पाहता केंद्र तसेच राज्य सरकारची चांगलीच डोकेदुखी वाढल्याचं म्हटलं जात आहे.