Vegetable Rate | बाजारात भाज्यांनी गाठली शंभरी; भाजीपाल्याच्या उत्पादनात मोठी घट


Vegetable Rate | सध्या महाराष्ट्रात वातावरणाची वेगवेगळी रुपं पहायला मिळत असून यंदा राज्यात अत्यल्प पाऊस झाल्याने डिसेंबर महिन्यातच नाशिक जिल्ह्याच्या अनेक भागात ट्रॅंकरने पाणी पुरवठा करावा लागतो आहे यावरुन नाशिक जिल्ह्यातील पाणी टंचाईची भीषणता लक्षात येऊ शकते. यातच येणाऱ्या उन्ह्याळ्यात ही परिस्थित आणखी बिकट असू शकते.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आलेल्या अवकाळी पावसाने आणि गारपीटीने शेतकऱ्यांना मेटाकुटीला आणलं असताना सध्या दोन दिवसांपासून राज्याभर थंडीचा तडाखा वाढू लागलेला आहे. या सगळ्या वातावरणातील बदलांचा परिणाम शेती पिकांवर होऊ लागल्यानं पिक उत्पादनातही मोठी घट होत आहे. यातच भाजी उत्पादनात घट झाल्याने गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवकदेखील घटली असून यामुळे भाज्यांच्या दरात 20 ते 30 रुपयांनी वाढ झाली आहे.

Vegetable Rate | संपुर्ण राज्याला या गारव्याने भरली चांगलीच हुडहुडी

राज्यासह नाशिक जिल्ह्यात हवेतील गारवा अचानक वाढू लागलेला आहे. संपुर्ण राज्याला या गारव्याने चांगलीच हुडहुडी भरली असून याचा परिणाम आता भाजी उत्पादनावर देखील मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्र तसेच उत्तर महाराष्ट्रातून मुंबईतील वाशी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक होते. मात्र राज्याच्या या भागांमध्ये पडलेल्या आवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं असताना सध्या बाजारात सर्वच भाजीपाला 90 ते 100 रुपयांवर गेला आहे. 

महाराष्ट्रातील वातावरणात सतत बदल होतअसून काही भागात थंडी तर काही भागात ढगाळ वातावरण तयार झालेलं असून या वातावरणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. दरम्यान त्यामुळे भाजीपाला उत्पादनात मोठी घट झालेली असताना यामध्ये गवार आणि भेंडी 120 रुपये किलोवर पोहोचली आहे. तर वांगे, दोडका आणि शेवगा भाजीने देखील आता शंभरी गाठून कांद्याने पन्नाशी गाठलेली आहे.