Farmers Loss | कृषी विभागाचा अजब फतवा; राज्यातील शेतकऱ्यांना वेठीला धरत असल्याचं चित्र


Farmers Loss | यंदा राज्याच्या अनेक भागातील शेतकऱ्यांना दुहेरी संकटांना सामोरे जावे लागले असून यंदा राज्यात अत्यल्प झालेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यासह राज्यतील काही भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली तर मागील काही दिवसांपुर्वी राजाच्या काही भागात झालेला अवकाळी आणि गारटपिटीचा तडाखा मोठ्या प्रमाणात खरिप हंगामातील शेतकऱ्यांना बसला आहे. यातच राज्य सरकारने शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर येण्यासाठी मदत करावी अशा मागणी राज्यातीस समस्त शेतकरी वर्गातून होत आहे.

दरम्यान, राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक रुपयांत पिक विमा देण्याचा मोठा गाजावाजा केला होता मात्र नंदुरबार जिल्ह्यात या योजनेचें आता खरं स्वरुप समोर आलं असून राज्यातील ज्या तालुक्यांनी 3 हजार हेक्टरवर हरभरा पिकाची लागवड केली आहे त्या तालुक्यातील शेतकऱ्यांना एक रुपया पीक विमा देण्याचा अजब गजब फतवा कृषी विभागाने काढलेला आहे. कृषी विभागाची ही दादागिरीच असल्याने राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Farmers Loss | पीक विम्यासाठी कृषी विभाग आता शेतकऱ्यांना वेठीला धरत असल्याचा दावा

पीक विम्यासाठी कृषी विभाग आता शेतकऱ्यांना वेठीला धरत असल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला असून यंदा नंदुरबार जिल्ह्यात दुष्काळी परिस्थतीमुळे खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. यातच नंदुरबार जिल्ह्यातील कुठल्याही एका तालुक्यात तीन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी होणार नसल्याचे स्पष्ट असल्याने कृषी विभागाच्या या नवीन फतव्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा मिळणार नाही. दरम्यान, सरकारच्या या धोरणावर नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.